ETV Bharat / bharat

Pan Aadhar linking : ३१ मार्चपर्यंत करा आधार लिंक; नाहीतर पॅनकार्डचा होणार नाही उपयोग - ट्विटद्वारे दिला अलर्ट

तुम्ही मोबाईलवरूनही आधार लिंक करू शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून UIDPAN < 12 अंकी Aadhar Number> < 10 अंकी Pan Number> टाइप करून 567678 या 561561 पर SMS करा. यानंतर तुम्हाला थोड्याच वेळात आधारशी पॅन जोडल्याचा मेसेज येईल.

Income tax dept alert
३१ मार्चपर्यंत करा आधार लिंक
author img

By

Published : Jan 19, 2023, 1:54 PM IST

नवी दिल्ली : आजच्या काळात पॅनकार्ड हे तुमच्या आर्थिक आरोग्याची स्थिती सांगणारा एक महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. तुमचा संपूर्ण डेटा आयकर विभागाकडे फक्त त्यावर नोंदवलेल्या नंबरद्वारेच राहतो. यामुळेच आयकर विभाग कार्डधारकांना पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी सतर्क करत आहे.

लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च 2023 : आधारशी पॅन लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च 2023 आहे. या तारखेपर्यंत आधार आणि पॅन कार्ड लिंक न केल्यास, तुमचा पॅन सक्रिय होणार नाही. यामुळे बँक खाते उघडणे, आयकर परतावा, शेअर्समध्ये गुंतवणूक करणे, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे यासारखे आर्थिक व्यवहार तुम्ही करू शकणार नाहीत.

ट्विटद्वारे दिला अलर्ट : आयकर विभागाने मंगळवारी, १७ जानेवारी रोजी विभागाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून पॅन कार्डधारकांना याची माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, आयकर कायदा, 1961 नुसार, सर्व पॅनकार्ड धारकांना 31 मार्च 2023 पूर्वी त्यांचे पॅन आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. लिंक न केलेला पॅन १ एप्रिल २०२३ पासून निष्क्रिय असेल. आपल्या ट्विटमध्ये विभागाने लिहिले की, तातडीची सूचना. उशीर करू नका, आजच लिंक करा.

  • As per Income-tax Act, 1961, it is mandatory for all PAN holders, who do not fall under the exempt category, to link their PAN with Aadhaar before 31.3.2023.
    From 1.04.2023, the unlinked PAN shall become inoperative.

    Urgent Notice. Don’t delay, link it today! pic.twitter.com/h7T6AAeDnc

    — Income Tax India (@IncomeTaxIndia) January 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कसे लिंक कराल आधार कार्ड : आधार कार्ड ही युनिक ओळख आहे. या मदतीने भारतीयाला मूलभूत सुविधा पुरविल्या जातात. भारतीय नागरिकाची ओळख आणि त्याची बायोमेट्रिक माहितीही आधार कार्डमध्ये समाविष्ट आहे. तुम्ही बायोमेट्रिक आधार पडताळणीद्वारे किंवा एनएसडिएल आणि युटिआयटिएसएलच्या पॅन सेवा केंद्रांना भेट देऊन लिंक करू शकता.

मोबाईलवरूनही करू शकता आधार लिंक : तुम्ही मोबाईलवरूनही आधार लिंक करू शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून UIDPAN < 12 अंकी Aadhar Number> < 10 अंकी Pan Number> टाइप करून 567678 या 561561 पर SMS करा. यानंतर तुम्हाला थोड्याच वेळात आधारशी पॅन जोडल्याचा मेसेज येईल.

असे होईल पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक : इंन्कम टॅक्सच्या वेबबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक होईल की नाही हे पाहू शकता. यासाठी सर्व प्रथम www.incometaxgov.in वर लॉगईन करा. यानंतर Our Service वर क्लिक करा. तेथे Link Aadhaar हा पर्याय दिसेल. नंतर Link Aadhaar Know About Aadhaar Pan Linking Status वर क्लिक करा. जेव्हा तुमच्यासमोर पेज ओपन होईल. तेथे PAN आणि Aadhaar Card चे तपशील भरा. नंतर 'View Link Aadhaar Status' वर क्लिक करा.

डीमॅट खात्यात नॉमिनीचे नाव टाका : डिमॅट खाते हे तुमच्या शेअर सर्टिफिकेट्स आणि इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटीजसाठी बँक खात्यासारखे असते. यातूनच तुम्ही शेअर बाजारातील व्यवहार करता. इतर सर्व बँक खात्यांप्रमाणेच, नामनिर्देशित व्यक्तीचा उल्लेख डीमॅट खात्यातही असणे आवश्यक आहे. 31 मार्चपर्यंत तसे न केल्यास डिमॅट खातेही बंद केले जाईल.

हेहा वाचा : Rupay BHIM UPI Transactions: रूपे कार्ड, भीम युपीआय वापरणाऱ्यांना होणार दुप्पट फायदा.. केंद्र सरकारची मोठी घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.