ETV Bharat / bharat

Landslide in Uttarakhand : उत्तराखंडात निर्माणाधीन बोगद्यात भूस्खलन झाल्यानंतर 36 मजूर अडकले, बचावकार्य सुरू - बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

Landslide in Uttarakhand : उत्तराखंडातील उत्तरकाशीमध्ये एक मोठी दुर्घटना घडलीय. यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यरा ते दांडल गावापर्यंत बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात भूस्खलनामुळे कामगार अडकले आहेत. याची माहिती मिळताच पोलिस, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचं पथक घटनास्थळी पोहोचले आणि बोगद्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्यात गुंतले आहेत.

Landslide in Uttarakhand
Landslide in Uttarakhand
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 12, 2023, 1:11 PM IST

Updated : Nov 12, 2023, 1:42 PM IST

निर्माणाधीन बोगद्यात भूस्खलन

उत्तरकाशी (उत्तराखंड) Landslide in Uttarakhand : उत्तराखंडातील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यरा ते दांडल गावापर्यंत निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळली आहे. एनएचआयडीसीएलच्या निर्देशानुसार एका कंपनीमार्फत हा बोगदा बांधण्यात येत आहे. यात बोगद्यात 36 हून अधिक मजूर अडकले असल्याचं सांगण्यात येत आहे. बोगद्यात नेमके किती कामगार अडकले आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. कंपनीकडून डेब्रिज हटवण्याचं काम सुरू आहे. घटनास्थळी पाच 108 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. पोलिस-प्रशासनाचं पथक घटनास्थळी उभं असून बचावकार्य सुरू आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी ही दुर्घटना घडलीय.

एसपी अर्पण यदुवंशी घटनास्थळी : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवेंद्र पटवाल म्हणाले की, बोगद्यात भूस्खलनाची पुष्टी झालीय. एनडीआरएफ आणि पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. एसपी अर्पण यदुवंशी यांनी सांगितलं की, घटनेनंतर अनेक बचाव पथकं पोहोचली आहेत. त्यांनी सांगितलं की, कंपनीच्या रेकॉर्डनुसार आतापर्यंत 36 कामगार बोगद्यात अडकले आहेत. सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडल्याचं त्यांनी सांगितलं. याठिकणी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. लवकरच सर्वांची सुखरूप सुटका केली जाईल, असंही ते म्हणाले. बोगद्याच्या आत ऑक्सिजन पाईप पोहोचवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. या घटनेत जीवितहानीबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.

बचावकार्य युद्धपातळीवर सुरु : एनएचडीसीएलचे माजी व्यवस्थापक कर्नल दीपक पाटील यांनी सांगितलं की, ब्रह्मखाल-पोळगाव मार्गावरील बोगद्याचं बांधकाम सुरू आहे. जे सिल्कयारपासून सुमारे 2340 मीटर अंतरावर आहे. दुसरीकडं, सिल्कियार बाजूकडून बोगद्याच्या 270 मीटर विभागाजवळील 30 मीटर परिसरात ढिगारा पडल्यानं सुमारे 36 मजूर बोगद्यात अडकले आहेत. याची माहिती मिळताच पोलीस, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहे. घटनास्थळी उपजिल्हाधिकारी, मुख्य विकास अधिकारी, अपर जिल्हादंडाधिकारी आणि महसूल विभागाचं पथकही उपस्थित आहे. मलबा हटवण्याचं काम सुरू आहे. या कामासाठी यंत्रेही तैनात करण्यात आली आहेत.

हेही वाचा :

  1. PM Narendra Modi Worship: पंतप्रधान मोदींनी कैलाशाचे दर्शन घेऊन केले ध्यान, शंखासह डमरू वाजून केली शिवभक्ती
  2. Earthquake in Uttarakhand : 6 महिन्यांत 10 व्या भूकंपानं हादरलं उत्तराखंड; सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही

Last Updated : Nov 12, 2023, 1:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.