तीरुपती: नवी मुंबईतील येथे व्यंकटेश्वराचे मंदिर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानाला भाडेपट्टयाने जमीन देण्याबाबतचे पत्र पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज देवस्थानचे अध्यक्ष वाय व्ही सुब्बा रेड्डी यांच्याकडे तिरुपती येथे जाऊन सुपूर्द केले. त्यापुर्वी त्यांनी श्री व्यंकटेश्वराचे दर्शन घेऊन पूजा केली. आज पहाटे आदित्य ठाकरे यांचे तिरुपती येथे आगमन झाले. यावेळी तिरुपती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी , देवस्थानाचे सदस्य मिलिंद नार्वेकर, आदींसह देवस्थानाचे अधिकारी उपस्थित होते.
तिरुपती देवस्थानाने विनंती केल्यावर राज्य शासनाने याविषयीचा निर्णय तत्काळ घेऊन जमीन उपलब्ध करुन देण्यात येईल अशी घोषना केली होती. त्यामुळे लाखो भाविकांची मोठी सोय होणार आहे. जमीन वाटपाचे पत्र देण्यासाठी स्वतः मंत्री आदित्य तिरुपतीला आले याविषयीही तीरुपती तीरुमल देवस्थानने समाधान व्यक्त करून आभार मानले आहेत.
-
Maharashtra minister Aaditya Thackeray handed over the letter of handing over land for Shri Venkateswara Temple in Navi Mumbai to YV Subbareddy, Chairman of Tirumala Tirupati Devasthanam Trust pic.twitter.com/MTjbp1Bu7o
— ANI (@ANI) April 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maharashtra minister Aaditya Thackeray handed over the letter of handing over land for Shri Venkateswara Temple in Navi Mumbai to YV Subbareddy, Chairman of Tirumala Tirupati Devasthanam Trust pic.twitter.com/MTjbp1Bu7o
— ANI (@ANI) April 30, 2022Maharashtra minister Aaditya Thackeray handed over the letter of handing over land for Shri Venkateswara Temple in Navi Mumbai to YV Subbareddy, Chairman of Tirumala Tirupati Devasthanam Trust pic.twitter.com/MTjbp1Bu7o
— ANI (@ANI) April 30, 2022