ETV Bharat / bharat

Lalu Yadav Bail : जमीन घोटाळा प्रकरणात लालू यादव व कुटुंबियांना जामीन मंजूर

Lalu Yadav Bail : जमीन घोटाळा प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना जामीन मंजूर झालाय. आता १६ ऑक्टोबरला या प्रकरणी पुढील सुनावणी होईल.

Lalu Yadav Bail
Lalu Yadav Bail
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2023, 1:24 PM IST

नवी दिल्ली Lalu Yadav Bail : लँड फॉर जॉब घोटाळा प्रकरणात राऊस अ‍ॅव्हेन्यू कोर्टानं बुधवारी लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांना ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. बुधवारी हे तिघेही जामीन घेण्यासाठी विशेष सीबीआय न्यायाधीश गीतांजली गोयल यांच्या न्यायालयात हजर झाले होते. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ ऑक्टोबरला होणार आहे.

२३ सप्टेंबरला समन्स बजावलं होतं : सीबीआयनं ३ जुलै रोजी दाखल केलेल्या दुसऱ्या पुरवणी आरोपपत्राची दखल घेत न्यायालयानं बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि इतर सर्व १७ आरोपींना २३ सप्टेंबरला समन्स बजावलं होतं. यामध्ये रेल्वेच्या तीन अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. न्यायालयानं त्यांना ४ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

काय आहे प्रकरण : हे संपूर्ण प्रकरण २००४ ते २००९ या काळात माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी रेल्वे मंत्री असताना मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये केलेल्या रेल्वेच्या ग्रुप डी भरतीशी संबंधित आहे. या दरम्यान रेल्वेत चुकीच्या पद्धतीनं भरती झाली होती. आधी नोकरीचं आमीष दाखवून उमेदवारांकडून जमिनी आणि सदनिका घेण्यात आल्या. मात्र नंतर त्या लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांना हस्तांतरित केल्या गेल्या.

ईडीचे लालू आणि निकटवर्तीयांवर छापे : ईडीनं या प्रकरणी लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांवर यापूर्वी छापे टाकले आहेत. ३१ जुलैला टाकलेल्या छाप्यात लालू प्रसाद यादव यांची गाझियाबाद आणि बिहारमधील मालमत्ता जप्त करण्यात आली होती. या मालमत्तेची सरकारी किंमत सुमारे ६ कोटी २ लाख रुपये एवढी होती. त्यापूर्वी १० मार्च २०२३ ला लालू प्रसाद यादव यांच्या १५ ठिकाणांवर ईडीनं एकाच वेळी छापे टाकले होते.

हेही वाचा :

  1. Lalu Prasad Yadav : लालू यादव आणि कुटुंबावर ईडीची मोठी कारवाई, 6 कोटींची मालमत्ता जप्त
  2. Lalu Prasad Yadav on INDIA Alliance : देशातील लोकशाही वाचवण्यासाठी विरोधकांनी अहंकार सोडून एकत्र यावं - लालू प्रसाद यादव
  3. Lalu Prasad Yadav : 'लढलो, लढणार आणि न घाबरता...', 75 वर्षीय लालूंचा बॅडमिंटन खेळतानाचा Video Viral

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.