ETV Bharat / bharat

lalu IN Presidential Election : लालू प्रसाद यादव राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत - Bihar News

निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाची निवडणूक ( President Polls 2022 ) जाहीर करताच बिहारच्या लालू प्रसाद यादव ( Lalu Prasad Yadav ) यांनी या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. लालू प्रसाद यादवांच्या या निर्णयाने या निवडणुकीची चर्चा वेगाने होऊ लागली आहे. हो, पण हे लालूप्रसाद यादव ते नाहीत ज्यांच्याबाबत तुम्ही आम्ही सर्वकाही जाणून आहोत. हे बिहारचे नेते लालूप्रसाद नाहीत तर बिहारमधील सारण जिल्ह्यात राहणारे एक नागरिक आहेत. योगायोगाने राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचीही कर्मभूमी सारण हीच राहिली आहे.

Lalu Prasad Yadav
लालू प्रसाद यादव
author img

By

Published : Jun 13, 2022, 12:13 PM IST

Updated : Jun 13, 2022, 3:12 PM IST

पाटणा - निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाची निवडणूक ( President Polls 2022 ) जाहीर करताच बिहारच्या लालू प्रसाद यादव ( Lalu Prasad Yadav ) यांनी या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. लालू प्रसाद यादवांच्या या निर्णयाने राष्ट्रपती निवडणुकीची ( President Polls 2022 ) चर्चा वेगाने होऊ लागली आहे. हो, पण हे लालूप्रसाद यादव ते नाहीत ज्यांच्याबाबत तुम्ही आम्ही सर्वकाही जाणून आहोत. हे बिहारचे नेते लालूप्रसाद नाहीत तर बिहारमधील सारण जिल्ह्यात राहणारे एक नागरिक आहेत. योगायोगाने राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचीही कर्मभूमी सारण हीच राहिली आहे.

लालू प्रसाद यादव राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या मैदानात

2017 मध्येही भरला होता अर्ज : लालू यादव यांचे म्हणणे आहे की, त्यांनी दिल्लीला जाण्यासाठी विमानाचे तिकीटही काढले आहे. 15 जूनला ते राजधानी दिल्लीत दाखल होणार आहेत. त्याच दिवशी ते राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी 2017 मध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवेळीही उमेदवारी अर्ज भरला होता. त्यावेळी बिहारचे तत्कालीन राज्यपाल रामनाथ कोविंद आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांच्यात प्रमुख लढत होती.

हे लालू यादव 7 मुलांचे पिता - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात सर्वप्रथम उडी घेणारे सारण जिल्ह्यातील रहिमपूर निवासी लालू प्रसाद यादव सांगतात की, गेल्यावेळी त्यांचा अर्ज निवडणूक आयोगाने बाद केला होता. कारण उमेदवारीसाठी आवश्यक असलेल्या प्रस्तावकांची संख्या मी पूर्ण करू शकलो नव्हतो. यावेळी मी पूर्ण तयारी केली आहे. या लालू प्रसाद यादवांना 7 मुले आहेत. 42 वर्षीय लालू यादवांचा उपजिविकेचा मार्ग शेती हाच आहे. फावल्या वेळात आपण सामाजिक कार्यात व्यग्र असतो, असे त्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपले नशीब आजमावणार आहोत असे त्यांचे म्हणणे आहे. निवडून येणे शक्य हे त्यांनाही माहिती आहे. किमान मी सर्वाधिक निवडणुका लढविल्याचा विक्रम निश्चित करू शकतो, असा त्यांचा दावा आहे.

2001 पासून सातत्याने निवडणुकीच्या मैदानात - हे लालू प्रसाद यादव महाशय 2001 पासून सातत्याने वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये आपली उमेदवारी जाहीर करीत आहेत. उमेदवारी अर्ज भरीत आहेत. मग ती निवडणूक पंचायत समितीची असो, विधानसभेची असो अथवा लोकसभेची असो. इतकेच काय ते राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही अर्ज भरायला मागेपुढे पहात नाहीत. ही गोष्ट वेगळी की ते कोणत्याही निवडणुकीत आपला चमक दाखवू शकले नाहीत. तथापि, राजद नेते लालू प्रसाद यादव यांचे आणि त्यांचे नाव एकच असल्याने आणि सारण हाच मतदारसंघ असल्याने ते प्रत्येक निवडणुकीत चर्चेमध्ये राहतात. त्यांचे म्हणणे आहे की, ज्या दिवशी लोक मला समजून घेतील त्या दिवशी मला एक संधी जरूर देतील. मात्र, आतापर्यंत त्यांना कोणीही समजून घेतलेले नाही, हेही तितकेच खरे.

राबडींच्या पराभवाचे झाले होते कारण - या लालू प्रसादांची एक महत्त्वाची बाब अशी की 2014 मध्ये ते राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या पराभवाचे प्रमुख कारण बनले होते. या निवडणुकीत भाजपचे राजीव प्रताप रुडींकडून राबडीदेवी 8 हजार मतांनी पराभूत झाल्या होत्या. तर या लालू प्रसाद यादवांना या निवडणुकीत तब्बल 15 हजार मते मिळाली होती. म्हणजेच ते विजयी तर होऊ शकत नाहीत, पण दिग्गजांना पराभूत मात्र निश्चितपणे करू शकतात.

Last Updated : Jun 13, 2022, 3:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.