पटना (बिहार) : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव 11 फेब्रुवारीला भारतात येत आहेत. सिंगापूरमध्ये किडनीच्या यशस्वी ऑपरेशननंतर ते आता निरोगी झाले आहेत. वडिलांना किडनी दान करणारी मुलगी रोहिणी आचार्य या सध्या चर्चेत आहेत. आता लालू बिहारमध्ये परतणार आहेत, त्यामुळे रोहिणी आचार्य भावूक झाल्या आहेत. वडिलांना सिंगापूरहून वापस पाठवताना त्यांनी एक भावनिक पोस्ट केली. रोहिणीने तिच्या वडिलांबाबत लोकांना आवाहन केले आहे. ट्विट करताना रोहिणी म्हणाल्या की, 'आता तुम्ही लोकं माझ्या वडिलांची काळजी घ्याल'.
मुलगी म्हणून कर्तव्य बजावत आहे : रोहिणीने तिच्या ट्विटर हँडलवरून एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये ती म्हणाते, मला तुम्हा सर्वांशी आपले नेते आदरणीय लालूजींच्या प्रकृतीबाबत खूप महत्वाचे बोलायचे आहे. पापा 11 फेब्रुवारीला सिंगापूरहून भारतात येणार आहेत. मुलगी म्हणून मी माझे कर्तव्य बजावत आहे. माझ्या वडिलांना बरं करत मी त्यांना तुम्हा सर्वांमध्ये पाठवत आहे. आता तुम्ही लोक वडिलांची काळजी घ्याल'.
कविताही लिहिली : यानंतर आणखी एक ट्विट करताना रोहिणीने वडिलांबद्दल एक कविताही लिहिली आहे. आपले कर्तव्य पार पाडून आपण आपल्या देवसमान वडिलांना वाचवले आहे. आता तुमची पाळी आहे, असे त्या म्हणाल्या. रोहिणीच्या या दोन्ही ट्विटने लोक भावूक झाले आहेत. रोहिणीने तिच्या वडिलांना किडनी दान केल्यानंतर तिची बरीच चर्चा झाली होती. तिच्या आरोग्यासाठी लोकांनी देवाची प्रार्थना आणि पूजाही केली होती.
डिसेंबर महिन्यात झाले किडनी प्रत्यारोपण : गेल्या डिसेंबर महिन्यात लालू प्रसाद यादव यांचे सिंगापूरमध्ये किडनी प्रत्यारोपण करण्यात आले होते. सिंगापूरच्या माउंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये हे प्रत्यारोपण करण्यात आले होते. लालू प्रसाद यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी त्यांची किडनी लालूंना दिली होती. यानंतर लालू यादव आपली मुलगी रोहिणी आचार्यसोबत सिंगापूरमध्ये राहिले. लालूप्रसाद भारतात परतणार अशा बातम्या बऱ्याच दिवसांपासून येते होत्या. आता येत्या काही दिवसांत लालू मायदेशी वापस येणार असल्याचे रोहिणी आचार्य यांच्या ट्विटवरून स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा : Droupadi Murmu Odisha Visit : योगाने मला मानसिक आणि शारीरिक त्रासातून बाहेर काढले - राष्ट्रपती मुर्मू