ETV Bharat / bharat

तुरुंगातून बाहेर येताच लालू 'अ‌ॅक्शन मोड'वर; आज घेणार राजद नेत्यांची व्हर्चुअल बैठक - tejasvi yadav news

दुपारी दोनच्या सुमारास ही बैठक सुरू होईल. यामध्ये लालू प्रसाद यादव पक्षाच्या कित्येक नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. यामध्ये ते १४४ नेत्यांनी या गंभीर परिस्थितीमध्ये आपापल्या क्षेत्रात काय केले, आणि काय करणे अपेक्षित आहे याबाबत ते मार्गदर्शन करतील. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी याबाबत माहिती दिली.

lalu-prasad-yadav-and-tejashwi-yadav-virtual-meeting-with-rjd-leaders
तुरुंगातून बाहेर येताच लालू 'अ‌ॅक्शन मोड'वर; आज घेणार राजद नेत्यांची व्हर्चुअल बैठक
author img

By

Published : May 9, 2021, 7:18 AM IST

पाटणा : राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालू प्रसाद यादव कित्येक वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर पडले आहेत. दिल्लीतील एम्समधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते आता आपली मुलगी मीसा भारतीच्या घरी आहेत. यानंतर आता लालू प्रसाद यादव यांनी कामाला सुरुवात केली असून, आज ते पक्षाच्या नेत्यांसोबच व्हर्चुअल बैठकीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.

दुपारी दोनच्या सुमारास ही बैठक सुरू होईल. यामध्ये लालू प्रसाद यादव पक्षाच्या कित्येक नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. यामध्ये ते १४४ नेत्यांनी या गंभीर परिस्थितीमध्ये आपापल्या क्षेत्रात काय केले, आणि काय करणे अपेक्षित आहे याबाबत ते मार्गदर्शन करतील. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी याबाबत माहिती दिली.

कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आले तेजस्वी..

तेजस्वी यादव यांनी आपला मतदारसंघ असलेल्या राघोपुरमधील कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यांनी प्रशासनाला कोणकोणत्या गोष्टींची खरेदी करावी, याबाबतची यादीही दिली आहे. या निधीमधून राघोपुर आणि बुदुपुर ब्लॉकमधील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडर आणि इतर सुविधा देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

तीन वर्षांनी बाहेर आलेत लालू..

झारखंड उच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर १२ दिवसांनी लालू प्रसाद यादव तुरुंगातून बाहेर आले. चारा घोटाळ्याप्रकरणी सुमारे तीन वर्षे ते तुरुंगात होते. १९ मार्च २०१८पासून ते तुरुंगात होते. सध्या ते जामीनावर बाहेर आले आहेत.

हेही वाचा : कोरोनाची दुसरी लाट मोदी सरकारची निती व चुकीच्या नियोजनाचा परिणाम!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.