ETV Bharat / bharat

सीईओ महिलेकडून चार वर्षाच्या चिमुकल्याचा गोव्यात खून; मृतदेह सुटकेसमध्ये भरुन गेली कर्नाटकात - गोवा पोलिसांच्या ताब्यात

Lady CEO Killed Child : बंगळुरू इथं कंपनीची सीईओ असलेल्या महिलेनं गोव्यातील हॉटेलमध्ये आपल्या चिमुकल्याचा खून केला. या चिमुकल्याचा मृतदेह सुटकेसमध्ये भरुन या महिलेनं गोवा ते कर्नाटक टॅक्सीनं प्रवास केला. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीनं या महिलेला चित्रदुर्ग जिल्ह्यात पकडलं.

Lady CEO Killed Child
संग्रहित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 9, 2024, 2:30 PM IST

बंगळुरू Lady CEO Killed Child : कंपनीच्या सीईओ महिलेनं चार वर्षाच्या चिमुकल्याचा खून करत त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये भरुन गोवा ते कर्नाटक असा प्रवास केला. ही धक्कादायक घटना हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेनं उघडकीस आली. सूचना शेठ असं त्या चार वर्षाच्या चिमुकल्याचा खून करुन मृतदेह सुटकेसमध्ये घालून प्रवास करणाऱ्या महिलेचं नाव आहे. सूचना शेठ या महिलेनं गोव्यातून कर्नाटक प्रवास करताना पोलिसांनी तिला चित्रदुर्ग शहरात मोठ्या शिताफीनं पकडलं आहे.

गोव्यातील हॉटेलमध्ये केला चिमुकल्याचा खून : सूचना शेठ ही महिला आपल्या चार वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन गोव्यातील हॉटेलमध्ये गेली होती. यावेळी सूचना शेठ या महिलेनं आपल्या चार वर्षाच्या चिमुकल्या मुलाचा खून करत मृतदेह सुटकेसमध्ये भरला. त्यानंतर तिनं गोवा ते कर्नाटक असा टॅक्सीनं प्रवास केला.

हॉटेलमधील कर्मचाऱ्याला दिसलं रक्त : सूचना शेठ या महिलेनं आपल्या चार वर्षाच्या चिमुकल्याचा खून केल्यानंतर शनिवारी हॉटेलची खोली रिकामी केली होती. यावेळी तिनं गोव्यातून कर्नाटकला जाण्यासाठी टॅक्सी बुक केली होती. मात्र खोली रिकामी केल्यानंतर हॉटेलमधील कर्मचाऱ्यानं खोलीत रक्ताचे डाग दिसले. त्यामुळं कर्मचाऱ्यांनी तत्काळ या घटनेची माहिती हॉटेल प्रशासनाला दिली.

मुलाला मित्राच्या घरी सोडल्याची मारली थाप : सूचना शेठ ही महिला आपल्या मुलाला घेऊन गोव्यात आली होती. मात्र त्यानंतर ती परत जाताना तिच्याकडं मूल नव्हतं. टॅक्सी चालकाला तिनं बाळाला मित्राकडं सोडल्याची थाप मारली होती. मात्र पोलिसांना संशय आल्यानं त्यांनी टॅक्सी चालकाकडं याबाबत विचारण केली. पोलिसांनी तिला मित्राचा पत्ता देण्यासाठी विचारलं, मात्र तिनं मित्राचा दिलेला पत्ता खोटा असल्याचं उघड झालं. त्यामुळं पोलिसांच्या संशयाला आणखी बळ मिळालं.

मुलाचा मृतदेह घेऊन गोवा ते कर्नाटक प्रवास : हॉटेल प्रशासनानं खोलीत रक्त आढळल्याची माहिती गोवा पोलिसांना दिली. त्यावरुन पोलिसांनी टॅक्सी चालकाशी संपर्क साधून त्याला तातडीनं जवळच्या पोलीस ठाण्यात टॅक्सी नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळं टॅक्सी चालकानं चित्रदुर्ग जिल्ह्यातील आयमंगला इथं टॅक्सी नेत तिला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी महिलेची सुटकेस तपासली असता, तिच्या सुटकेसमध्ये मुलाचा मृतदेह असल्याचं उघड झालं. पोलिसांनी सूचना शेठ हिला अटक केलं आहे. मात्र तिनं मुलाच्या खुनाचं कारण सांगितलं नाही. आरोपी सूचना शेठला गोवा पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती आयमंगला पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे.

हेही वाचा :

  1. धक्कादायक! अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या ६ वर्षीय चिमुकल्याचा खून
  2. धक्कादायक..! क्षुल्लक कारणावरून आईने केला सहा वर्षांच्या चिमुकल्याचा खून
  3. पती-पत्नीच्या भांडणात मेहुणीचा १ महिन्याचा चिमुकला ठरला बळी, मंगळवारी होते नामकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.