ETV Bharat / bharat

जेवणात लाडू न मिळाल्याने भर लग्नात नवरदेव नाराज, नवरा -नवरीच्या कुटुंबात मारामारी, पोलिसांनी काढली समजूत - लग्नात लाडूंनी सारे वातावरण बिघडवले

छत्तीसगडच्या मुंगेलीमध्ये केवळ लाडू मिळाले नाही म्हणून एक लग्न मोडता मोडता ( Groom refuses to marry in Mungeli ) वाचले. या लग्नात लाडूंनी सारे वातावरण बिघडवले (Laddu created a ruckus in marriage ) होते. पोलिसांनी ( Mungeli Kotwali Police ) प्रकरणाचे गांभीर्य समजून दोन्ही कुटुंबांना समजावून सांगत लग्न पार पाडले.

Groom refuses to marry in Mungeli
जेवणात लाडू न मिळाल्याने लग्नात नवरदेव नाराज, नवरा -नवरीच्या कुटुंबात मारामारी, पोलिसांनी काढली समजूत
author img

By

Published : Apr 27, 2022, 10:32 PM IST

मुंगेली ( छत्तीसगड ) : सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. पण लग्नाच्या मोसमात एक गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे नावरदेवाकडच्या लोकांचा रुबाब आणि नखरे. असाच एक विवाह मुंगेलीत पाहायला (Laddu created a ruckus in marriage ) मिळाला. जिथे एका किरकोळ गोष्टीवरून नवरदेवाला राग आला आणि त्याने थेट लग्नाला नकार ( Groom refuses to marry in Mungeli ) दिला. मग काय, हे संपूर्ण प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. पोलिस ठाण्यात लग्न न होण्याचे कारण सापडल्यावर पोलिसही चक्रावून गेले. अखेर मुलीकडच्यांची अवस्था पाहून पोलिसांनी ( Mungeli Kotwali Police ) संतापलेल्या नवरदेवाची समजूत घालून त्याला मंडपात बसवले.

असे आहे संपूर्ण प्रकरण : मुंगेली जिल्ह्यातील चारभाटा येथील रहिवासी रामभज साहू यांची मुलगी कुंती हिचा विवाह बेमेटारा येथे राहणारा गुणीराम साहू यांचा मुलगा सूरज साहू याच्याशी होत होता. बेमेटारा येथील मुर्ता गावातून मिरवणूक नियोजित वेळेवर पोहोचली. लग्नाचे सर्व विधी चालू होते. मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व लोकांना भोजन दिले जात होते. वधूपक्षाने त्यांच्या क्षमतेनुसार सर्व व्यवस्था केली होती. वराकडील लोकांच्या जेवणाची वेगळी व्यवस्था करण्यात आली होती.

लाडू न मिळण्यासाठी मारामारी : दरम्यान, नावरदेवाकडील लोकांनी जेवणात लाडूंची मागणी केली. यावर मुलीच्या कुटुंबीयांनी लाडू नसल्याचे सांगून नकार दिला. इथेच सगळं बिनसलं. लाडू न मिळाल्याने वराचे कुटुंबीय आणि वर संतप्त झाले. प्रकरण वाढल्यावर हाणामारीपर्यंत पोहोचले. हे सर्व दृश्य पाहून वराने लग्नास नकार देत मंडपच सोडला.

प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले : कोतवाली पोलिस ठाण्यात वधू-वराकडील लोकं एकमेकांविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोहोचले. वराच्या बाजूने आणि वधूच्या बाजूने मारहाणीची तक्रार दाखल करायची होती. पण पोलिसांना या प्रकरणाचे मूळ आधी समजले. त्यानंतर दोन्ही कुटुंबांना बसवून या कृत्यामुळे दोन्ही कुटुंबासह गावाची बदनामी होणार असल्याचे पोलिसांनी समजावून सांगितले. दोन कुटुंबांमध्ये लहानसहान गोष्टीवरून निर्माण होत असलेले नवीन नाते संपवणे योग्य नाही. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी लग्नाला सहमती दर्शवली आणि वराने मंडपात परत येऊन लग्न केले. यावेळी उपस्थित सर्वांनी सिटी कोतवाली पोलिसांचे जोरदार कौतुक केले.

हेही वाचा : हळदी-कुंकू कार्यक्रमात मानपान केला नाही म्हणून मुलाने लग्न नाकारले; गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.