ETV Bharat / bharat

Child Complains Father Drinking Alcohol : वडील दारू पितात म्हणून चिमुकल्याने गाठले पोलीस ठाणे, ठाणेदारांना म्हणाला दारुचे दुकान करा बंद - कुशीनगर पोलीस ठाण्यातील ठाणेदारांकडे तक्रार

आठ वर्षाच्या चिमुकल्याने पोलीस ठाणे गाठत ठाणेदाराला पप्पा रोज दारू पिऊन घरी येत आहेत. त्यामुळे आमच्या कुटुंबावर वाईट परिणाम होत असल्याची तक्रार केली. ही माझीच नाही, तर लाखो मुलांची अवस्था असल्याचेही त्याने यावेळी सांगितले. दारू विक्री बंद करा असे आर्जव त्या चिमुकल्याने कुशीनगर पोलीस ठाण्यातील ठाणेदारांकडे केले. त्यामुळे ठाणेदारांनी त्याला शैक्षणिक साहित्य देत घरी नेऊन सोडले. तर त्याच्या वडिलांना दारू न पिण्याची शपथ दिली.

Child Complaint Father Drinking Alcohol
ठाणेदार डॉ. आशुतोष कुमार तिवारी यांच्यासह चिमुकला
author img

By

Published : Jan 25, 2023, 6:38 PM IST

कुशीनगर (उत्तर प्रदेश) - वडील दररोज दारू पिऊन घरी येत असल्याने चिमुकल्याने थेट पोलीस ठाणे गाठत ठाणेदाराकडे दारू बंद करण्याची मागणी केली. त्यामुळे पोलीस ठाण्यातील ठाणेदारांसह उपस्थित कर्मचाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. यावेळी भावूक झालेल्या ठाणेदारांनी त्या चिमुकल्याला जवळ घेत पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य घेऊन देत त्याला घरी सोडले. त्यानंतर त्याच्या वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून घेत त्यांची चांगलीच कानउघडणी केली.

दारूचे दुकान बंद करा, पापा दारू पिणार नाहीत : कुशीनगर पोलीस ठाण्यात आठ वर्षाचा चिमुकला घाईघाईने आला. यावेळी त्याने ठाणेदारांना पाहुन आर्जव करत ठाणेदार अंकल पप्पा रोज दारू पिऊन घरी येतात. त्यांच्या नशेच्या सवयीने आमच्या संपूर्ण कुटूंबावर विपरित परिणाम होतात. त्यामुळे आमच्या कुटुंबावर वाईट परिणाम पडत आहेत. ही माझ्यासारख्या लाखो मुलांची अडचण आहे. त्यामुळे दारूचे दुकाने बंद करा, त्यामुळे पप्पा दारू पिणार नाहीत, असे आर्जव त्या चिमुकल्याने केले. त्यामुळेच मी त्यांची तक्रार करण्यास पोलीस ठाण्यात पोहोचल्याचे त्या चिमुकल्याने ठाणेदारांना सांगितले. यामुळे उपस्थित सगळेच भाऊक झाले.

ठाणेदारांनी दिले शैक्षणिक साहित्य : आठ वर्षाच्या चिमुकल्याने ठाणेदारांकडे दारूचे दुकान बंद करण्याची विनंती केल्याने ठाणेदार डॉ. आशुतोष कुमार तिवारी हे देखील भाऊक झाले. त्यांनी आठ वर्षाच्या चिमुकल्याला आपल्या मांडीवर घेत त्याची समजूत घातली. त्याला शैक्षणिक साहित्य घेऊन देत त्याला त्याच्या घरी नेऊन सोडले. त्याच्या शिक्षणाचा सगळा खर्च डॉ. आशुतोषकुमार तिवारी यांनी आपण करणार असल्याचे यावेळी सांगितले. त्या चिमुकल्याला त्याच्या वडिलाकडून दत्तक घेणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. गुणी बालकांच्या विकासासाठी समाजातील जागरूक नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहनही डॉ. आशुतोषकुमार तिवारी यांनी यावेळी केले.

चिमुकल्याच्या वडिलांना दिली दारू न पिण्याची शपथ : कुशीनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार डॉ. आशुतोष कुमार तिवारी यांनी त्या चिमुकल्याच्या वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. यावेळी त्यांनी त्याच्या वडिलांची समसजूत घातली. त्यांना यापुढे दारू न पिण्याची ताकीद दिली. त्यासह त्यांनी चिमुकल्याच्या वडिलांना यापुढे कधीही दारू न पिण्याची शपथ दिली. त्यामुळे उपस्थित पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यापुढे चिमुकल्याच्या वडिलाने दारू न पिण्याची शपथ घेतली.

हे ही वाचा - Thunivu Style Bank Robbery : थुनीवू हा चित्रपट पाहून तरुणाने बँकेत टाकला दरोडा, कर्मचाऱ्यांनी आवळल्या मुसक्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.