दीव - आत्मनिर्भर भारत व वोकल फॉर लोकल अभियान दिव, दमणमध्ये उत्तमरित्या सुरू आहे. याचा मला अभिमान आहे, असे भावोद्गार राष्ट्रपती रामनाथ यांनी काढले. विविध विकासकामांच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, दीवमध्ये एजुकेशन हब स्थापन करण्याची संकल्पना कौतुकास्पद आहे. संघ राज्य-क्षेत्रातील तिन्ही जिल्हे ‘उघड्यावर शौचपासून मुक्त’ घोषित झाले आहे. स्थानीय प्रशासनाने घरोघरी जाउन कचरा गोळा करण्याचे अभियान उत्तमरित्या राबविले आहेत. त्याचबरोबर 2019 मध्ये स्वच्छ सर्वेक्षणमद्ये दीव व दमनला प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी येणाऱ्या 2021 वर्षासाठी शुभेच्छे दिल्या.
हेही वाचा - भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांना जीवे मारण्याची धमकी
हेही वाचा - भाजपा सरकारमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय - अखिलेश यादव