ETV Bharat / bharat

कोरोना मृतांच्या सरकारी आकडेवारीवर प्रश्नचिन्ह का? वाचा भयावह वास्तव...(भाग-2) - corona death

देशात दररोज समोर येणारी कोरोनाग्रस्तांची आकडेवारी भयावह आहे. गेल्या चार दिवसांपासून सातत्याने 2 लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. तर हजारहून अधिक मृत्यूंची नोंद होत आहे. सरकारकडून ही आकडेवारी जाहीर केली जात आहे. मात्र वास्तव जरा वेगळे आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या सरकारी आकडेवारीपेक्षा अधिक आहे. याविषयी संपूर्ण जाणून घेण्यासाठी वाचा हा रिपोर्ट...

कोरोना मृतांच्या सरकारी आकडेवारीवर प्रश्नचिन्ह का? वाचा भयावह वास्तव...(भाग-2)

author img

By

Published : Apr 19, 2021, 6:51 AM IST

हैदराबाद : देशात गेल्या चार दिवसांपासून सातत्याने दोन लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत आहेत. यावरूनच कोरोनाची दुसरी लाट किती भयावह आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो. याशिवाय कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचे आकडेही दिवसेंदिवस वाढतच आहेत. सरकारी आकडेवारीनुसार गेल्या तीन दिवसांपासून दररोज एक हजारपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यु होत आहे. मात्र या आकडेवारीवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. स्मशानभूमींमध्ये होणारे अंत्यसंस्कार आणि सरकारच्या मृत्यूच्या आकडेवारीत तफावत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच या आकडेवारीवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे.

संशयाच्या भोवऱ्यातील या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतने काही ग्राऊंड रिपोर्टच्या आधारे तीन प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रश्नांच्या पूर्वी गुजरात आणि महाराष्ट्रातील एका-एका शहरातील आकडेवारी तुमच्यासमोर आम्ही मांडतो. यावरून ही आकडेवारी संशयाच्या भोवऱ्यात का सापडली आहे ते तुमच्या लक्षात येईल. या ग्राऊंड रिपोर्टच्या पहिल्या भागात आम्ही मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि दिल्लीतील आकडेवारी सादर केली होती. या राज्यांमध्ये कोरोना मृतांची सरकारी आकडेवारी आणि स्मशानभूमीतील अंत्यसंस्काराच्या आकडेवारीत तफावत असल्याचे दिसून आले होते. आता महाराष्ट्रातील अहमदनगर आणि गुजरातच्या भावनगरमधील आकडेवारी आम्ही तुमच्यासमोर ठेवतो.

महाराष्ट्रातील आकडेवारी
महाराष्ट्रातील आकडेवारी
अहमदनगरमध्ये आकडेवारीत तफावत

महाराष्ट्र

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात अक्षरशः तांडव बघायला मिळत आहे. या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. महाराष्ट्रात दररोज सरासरी 60 हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत आहेत. दररोज आढळणारे रुग्ण आणि मृतांच्या आकडेवारीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचे दिसून येत आहे. मात्र महाराष्ट्रातील मृतांच्या आकडेवारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. राज्यातील अहमदनगरमधील अमरधाम स्मशानभूमीत 9 एप्रिलला 49 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र सरकारी आकडेवारीनुसार 9 एप्रिल रोजी अहमदनगरमध्ये केवळ 3 जणांचाच कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर महाराष्ट्रात 9 एप्रिल रोजी कोरोना मृतांचा आकडा 301 होता. त्यामुळे जर एका शहरातील स्मशानभूमीतच या दिवशी 49 मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत असतील तर ही आकडेवारीही संशयाच्या भोवऱ्यात येते. विशेष म्हणजे महाराष्ट्रात दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या 60 हजारांच्या वर आहे.

गुजरातमधील आकडेवारी
गुजरातमधील आकडेवारी
अरविंद परमार यांनी दिलेली माहिती

गुजरात

गुजरातमध्येही गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोना संक्रमणाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. गुजरातमध्ये शनिवारी कोरोनाचे 8920 नवे रुग्ण आढळले तर 94 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र इथल्या मृतांच्या आकडेवारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. राज्यातील भावनगरमधील कुभारवाडा दफनभूमीत 15 एप्रिल रोजी 20 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. भावनगरमध्ये एकूण 3 स्मशानभूमी असून येथे दररोज मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात. मात्र सरकारी आकडेवारीनुसार 15 एप्रिल रोजी भावनगरमध्ये कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. कुंभारवाडा दफनभूमीचे ट्रस्टी अरविंद परमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दफनभूमीत दररोज 15 ते 20 मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात. यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचाही समावेश असतो. याशिवाय शहरातील इतर तीन स्मशानभूमीतही कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांवर अंत्यसंस्कार केले जातात. मात्र सरकारी आकडेवारीत कधी एक तर कधी दोन जणांचाच कोरोनामुळे मृत्यू होत असल्याची नोंद होते असे ते म्हणाले.

आकडेवारीवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्रातील अहमदनगर आणि गुजरातमधील भावनगर या दोन्ही शहरांतील केवळ एका स्मशानभूमीतील आकडेवारी ईटीव्ही भारत ने सादर केली. भावनगरमधील एकाच स्मशानभूमीतील आकडेवारीनुसार 15 एप्रिल रोजी 20 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याशिवाय भावनगरमध्ये 3 आणखी स्मशानभूमी आहेत. मात्र सरकारी आकडेवारीनुसार 15 एप्रिल रोजी भावनगरमध्ये कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद नाही. याशिवाय महाराष्ट्रातील अहमदनगरमधील एकाच स्मशानभूमीत 49 मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले. तर सरकारी आकडेवारीनुसार केवळ तीन जणांचाच कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. अहमदनगर जिल्ह्यात याशिवाय इतरही अनेक स्मशानभूमी नक्कीच असणार. याशिवाय संपूर्ण राज्यातील इतर स्मशानभूमी आणि दफनभूमी येथे होणाऱ्या अंत्यसंस्काराचा केवळ अंदाजच लावला जाऊ शकतो.

यापैकी काही मृत्यूंमागे कोरोनाशिवाय इतर कारणे असण्याचीही शक्यता आपण गृहीत धरली तरी दर 24 तासांत कोरोनाग्रस्तांची वाढणारी आकडेवारी आणि वेगवेगळ्या ठिकाणहून कोरोना मृतांवर अंत्यसंस्काराच्या येणाऱ्या बातम्या पाहिल्या तर यावरून सरकारी आकडेवारीवर निश्चितच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

ईटीव्ही भारतचे तीन प्रश्न
ईटीव्ही भारतचे तीन प्रश्न

ईटीव्ही भारतचे तीन प्रश्न

स्मशानभूमी आणि सरकारी आकडेवारीतील तफावतीविषयी ईटीव्ही भारतने 3 प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर राज्य तसेच केंद्र सरकारने स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. हे प्रश्न असे आहेत.

  1. मृतांच्या आकडेवारीत तफावत का?
  2. मृतांची आकडेवारी लपविली जात आहे का?
  3. आकडेवारी एकत्रित करण्यात समन्वयाचा अभाव आहे का?

या प्रश्नांवर सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. कारण 2020 पासूनच कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.