मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत भरमसाठ वाढ झाल्याने महागाईचा आगडोंब उसळला आहे. महागाईत होरपळत असलेल्या सामान्यांना दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादनशुल्कात कपात करत असते. बाजारातील पेट्रोल-डिझेलच्या दरातील चढ-उतारावर वस्तूंचे दर अवलंबून आहेत. महागाईमधील चढ-उतार हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल दर ठरवत असतात. त्यामुळे पेट्रोल-डिझेल दरांवर नियंत्रण राहणे गरजेचे आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर ठरतात. त्याचा परिणाम सर्वसामान्यांचा रोजच्या वापरातील वस्तूंच्या दरांवरही पडत असतो.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काय बदल आहेत : नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 51 पैसे, तर डिझेलचा दर 93 रुपये 02 पैसे आहे. मुंबईमध्ये काय बदल झाला आहे ? मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे आहे. तर डिझेल 94 रुपये 27 पैसे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 03 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 58 पैसे. यवतमाळमध्ये पेट्रोलच्या दरात 107 रुपये 96 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 47 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 106 रुपये 85 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 36 पैसे आहे.
इंधनाच्या किमती कशा ठरतात : तेल शुद्धीकरण कारखान्यातून कच्चे तेल बाहेर पडल्यानंतर त्याची मूळ किंमत नक्की केली जाते. इंधनाची ही मूळ किंमत प्रतिलिटर अशी निश्चित असते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर, शुद्धीकरणाचा खर्च आणि देशांतर्गत बाजारपेठेतील मागणी इत्यादी घटक त्यासाठी विचारात घेतले जातात. शुद्धीकरण केलेले इंधन प्रत्यक्ष पेट्रोल पंपावर पोहोचेपर्यंत त्यात अनेक खर्च जोडले जातात.
इंधनाचे दर : या खर्चांमध्ये तेल वाहतुकीचा खर्च, केंद्र आणि राज्यांचे कर आणि डीलरचे कमिशन यांचा समावेश आहे. या सगळ्यांची एकत्रित बेरीज करून प्रत्यक्ष पंपावर विकल्या जाणाऱ्या पेट्रोल-डिझेलची प्रतिलिटर किंमत ठरवते. सर्व खर्च अंतिमत: ग्राहकाकडून वसूल केला जातो. कच्च्या तेलाच्या आयातीचा करार झाला असेल तर संबंधित देशाकडून तेल आयात केले जात असते. कच्चे तेल घेतल्याच्या दिवसापासून २२व्या दिवशी पेट्रोल पंपांपर्यंत पोहोचते. म्हणजे १ तारखेला कच्च्या तेलाचा व्यवहार झाला असेल तर प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी २२ दिवसांचा वेळ लागतो. देशांतर्गत तेल उत्पादक कंपन्या इंधनाचे दर ठरवत अ्सतात.
हेही वाचा : Petrol Diesel Rates today : खिशाला झळ की दिलासा? तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर काय आहेत, वाचा आजचे दर