ETV Bharat / bharat

Investment Plans : गुंतवणूक करायची आहे? हे आहेत 4 सर्वोत्कृष्ट प्लॅन - गुंतवणूक करण्यासाठी कोणते आहे बेस्ट प्लॅन

सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक ( Investment Plans ) करणे महत्वाचे आहे. प्रत्येक व्यक्ती योग्य गुंतवणूकीचा पर्याय शोधत असते जेणेकरून भविष्यात जास्त आर्थिक समस्या उद्भवू नये. ( Make An investment Here Are The 4 Best Plans )

Investment Plans
भविष्यासाठी गुंतवणूक
author img

By

Published : Sep 21, 2022, 3:21 PM IST

सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक ( Investment Plans ) करणे महत्वाचे आहे. प्रत्येक व्यक्ती योग्य गुंतवणूकीचा पर्याय शोधत असते जेणेकरून भविष्यात जास्त आर्थिक समस्या उद्भवू नये. जर गुंतवणूक करायची आहे तर हे आहेत 4 सर्वोत्कृष्ट प्लॅन. ( Make An investment Here Are The 4 Best Plans )

  • बँक फिक्स्ड डिपॉजिट ( fixed Deposits ) : सर्व प्रथम आम्ही बँक मुदत ठेवींविषयी सांगू. ज्यामध्ये ते ठेवीदारांना भांडवली सुरक्षा आणि निश्चित उत्पन्न प्रदान करते. एफडी खाते उघडताना लागू असणारा व्याज दर एफडी कालावधीत समान राहील, व्याज दरात कोणताही बदल होणार नाहीत. रिझर्व्ह बॅंकेची (आरबीआय) सहाय्यक कंपनी डीआयसीजीसीने दिलेल्या डिपॉझिट विमा कार्यक्रमांतर्गत शेड्यूल बँकांमध्ये उघडल्या गेलेल्या एफडीदेखील येतात. ही विमा योजना बँकांमधील ठेवींना आर्थिक सुरक्षा देते.
  • डेट म्यूचुअल फंड ( Debt fund ) : डेट म्युच्युअल फंड सामान्यत बाजारातील फिक्स्ड इनकम इंस्ट्रूमेंटमध्ये गुंतवणूक करतात जसे की सरकारी सिक्युरिटीज, मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स, कॉर्पोरेट बॉन्ड्स इ. निश्चित उत्पन्नाच्या साधनांमुळे डेट म्युच्युअल फंडांना इक्विटी फंडांपेक्षा अधिक सुरक्षित मानले जाते. कारण फिक्स्ड इनकम इंस्ट्रूमेंट खरेदी किंवा विकली जाऊ शकतात आणि म्हणूनच ही खाती मुदत ठेवींपेक्षा जास्त रिटर्न देतात.
  • इक्विटी म्युच्युअल फंड ( Equity Funds ) : इक्विटी म्युच्युअल फंड बहुधा त्यांचे पैसे इक्विटी किंवा स्टॉकमध्ये गुंतवतात. इक्विटी म्युच्युअल फंडांना इक्विटीमध्ये किमान 65 टक्के गुंतवणूक करावी लागते. इक्विटीने निश्चित उत्पन्नाच्या साधनांपेक्षा आणि चलनवाढीपेक्षा जास्त परतावा दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांना इक्विटीद्वारे जास्त परतावा हवा असेल .पण थेट स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ किंवा कौशल्य नसेल अशा गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
  • लघु बचत योजना ( Small saving scheme ) : लघु बचत योजना भारतात खूप लोकप्रिय आहेत. लघु बचत योजना मध्यमवर्गीय खास करून नोकरदार वर्गासाठी फार लोकप्रिय आहे. या योजना केंद्रीय अर्थ मंत्रालय पुरस्कृत करतात आणि त्या प्रत्येक तिमाहीमध्ये या बचत योजनांसाठी व्याज दर जाहीर करतात. या योजनांमध्ये बँकेपेक्षा किंचित जास्त व्याज दिले जाते. ज्या लोकांना सर्वाधिक व्याज दर आणि त्यांच्या गुंतवणूकीवरील सुरक्षिततेची हमी हवी आहे अशा व्यक्ती त्यास प्राधान्य देऊ शकतात. या ठेव योजनांवर आयकरात सूटही मिळू शकते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.