मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल चलन लोकप्रिय झाले आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजीटल चलनाची निर्मिती केली जाते. डिजिटल चलन एन्क्रिप्टेड म्हणजे कोडेड असते. यामुळे याला क्रिप्टोकरन्सी म्हटले जाते. क्रिप्टोकरन्सीला म्हणजे आभासी चलन होय. क्रिप्टोकरन्सी हे एक स्वतंत्र चलन आहे व त्याचा कोणीही मालक नाही. क्रिप्टोकरन्सी हे चलन संगणकाचा वापर करून बनवलेले चलन आहे. पहिले बिटकॉइन २००९ मध्ये सातोशी नाकामोटो यांनी तयार केली होती. ह्याचा वापर करून आपण जगातील कोणत्याही व्यक्तीला पैसे पाठवू (Cryptocurrency Prices Today) शकतो.
क्रिप्टोकरन्सी दर : आज बिटकॉइनची किंमत 13,95,723 रूपये आहे. इथेरिअमची किंमत 1,04,432 रूपये आहे. बायनान्सची किंमत 21,555 रूपये (Cryptocurrency Prices 7 January 2023) आहे.
भारतात क्रिप्टोकरन्सी : व्हर्च्युअल करन्सीच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार करायला सुप्रीम कोर्टाने मार्च 2020मध्ये परवानगी दिली (Bitcoin Rate Today) आहे. एप्रिल 2018मध्ये रिझर्व्ह बँकेने क्रिप्टोकरन्सीच्या ट्रेडिंगवर सरसकट बंदी घातली होती. म्हणजे बँका किंवा कोणत्याही वित्त संस्थांना व्हर्च्युअल करन्सीशी निगडीत कोणतीही सेवा देता येणार नव्हती. इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाने याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. इतर अनेक देशांनी क्रिप्टोकरन्सीच्या ट्रेडिंगला परवानगी दिलेली आहे. इतकेच नाही तर स्वतःची क्रिप्टोकरन्सीदेखील लाँच केलेली आहे, असे इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशनचे म्हणणे होते. यावर निर्णय देत सुप्रीम कोर्टाने क्रिप्टोकरन्सीमधल्या व्यवहारांचा मार्ग खुला (Cryptocurrency Prices Today in India) केला.
क्रिप्टोकरन्सीचे फायदे : क्रिप्टोकरन्सी हे एक सुरक्षित व गोपनीय पेमेंट सेवा पुरविणारे साधन आहे. हे ब्लॅक चेनवर आधारित कार्य करत असल्यामुळे यामध्ये सहसा फसवणुकीचे प्रकार घडत नाहीत. व्यवहार करताना फी ही खूप कमी राहते. व्यवहारावर बंधने नाहीत. जगात कुठेही कोणत्याही व्यक्तीला पैशाची देवाणघेवाण करता येते . क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून आपण दिवसाचे 24 तास आठवड्याचे 7 ही दिवस आणि वर्षाचे ३६५ दिवस कधीही व्यवहार करू (price of Ethereum) शकतो.
क्रिप्टोकरन्सीचे तोटे : क्रिप्टोकरन्सीवर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे आपल्यासोबत फ्रॉड झाल्यास आपण काहीच करू शकत नाही. क्रिप्टोकरन्सीमध्ये कोणत्याही प्रकारचे नियम नसल्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये एक वेळेस व्यवहार झाल्यास आपण त्या व्यवहाराला रिव्हर्स करू शकत नाही. ही करन्सी खूप जास्त अस्थिर आहे. क्रिप्टोकरन्सीचा दर हा खूप जास्त प्रमाणात कमी जास्त होतो. क्रिप्टोकरन्सीचा वापर हा गैरकृत्य करण्यासाठी होऊ शकतो. कारण की, यावर कोणाचेही नियंत्रण (Price of Binance) नसते.