जयपूर - राजस्थानमधील उदयपूर हे तलावाचं शहर म्हणजे लेक सिटी म्हणून ओळखले जाते. आशियामधील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कृत्रिम तलाव असलेल्या जयसमंद तलावाची माहिती ईटीव्ही भारतने या स्पेशल रिपोर्टमधून दिली आहे.
उदयपूर जिल्ह्याच्या मुख्यालयापासून ४८ किलोमीटर अंतरावर जयसमंद तलाव आहे. या तलावाला ढेबर म्हणूनही ओळखल जाते. हा आशियामधील दुसऱ्या क्रमाकांचा मानवनिर्मित तलाव आहे. १६८७ ते १६९१ या कालावधीत या कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली.
हेही वाचा-पब्जी खास भारतीयांसाठी १८ मे रोजी होणार लाँच; नोंदणी केल्यानंतर मिळणार बक्षिसे
ही आहेत जयसमंद तलावाची वैशिष्ट्ये
- या तलावाचे मूळ नाव ढेबर आहे.
- दोन डोंगरांमध्ये ढेबर दरीला जोडून या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे.
- महाराणा जयसिंह यांनी तलावाची निर्मिती केली आहे. त्यामुळे तलावाला त्यांच्या नावाने जयसमंद ओळखले जाऊ लागले.
- गोड्या पाण्याच्या तलावात ७ बेटे आहेत.
- हा तलाव ३६ वर्ग किलोमीटर क्षेत्रात आहे. तलावाची लांबी १४ किलोमीटर आणि रुंदी ९ किलोमीटरपर्यंत विखुरलेली आहे.
- येथे गोमती, झावरीसमवेत ९ नदी आणि ९९ ओढ्यांचे पाणी मिसळते.
- घाटावर असलेली स्थापत्य कला लोकांचे प्रमुख आकर्षण आहे. घाटावर बांधण्यात आलेली छत्रीदेखील पर्यटकांना आकर्षित करतात.
- या तलाव परिसरात अनेक चित्रपटांचे शूटिंग करण्यात आले आहे.
- तलावाच्या दक्षिणेकडे डोंगरामध्ये महाराणा फतह सिंह यांनी राजवाडेही बांधले आहेत. येथे असलेला हवामहल आणि रूठी राणीचा महल अत्यंत प्रसिद्ध आहे. जयसमंद तलाव पाहण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात.
हेही वाचा-लस मिळत नसताना लसीकरणाची कॉलर ट्यून त्रासदायक-दिल्ली उच्च न्यायालय
92 किमीपर्यंत पसरला आहे तलाव-
स्थानिक वन अधिकाऱ्याने सांगितले की, तलावातील पाणी ओवरफ्लो झाल्यानंतर अरबी समुद्रात जाते. पर्यटक विजय शर्मा म्हणाले, की जयसमंद हा आशियामधील दुसऱ्या क्रमाकांचा सर्वात मोठी कृत्रिम तलाव आहे. हा तलाव 92 किमीपर्यंत पसरलेला आहे.
फोटोग्राफर चंद्रदीप म्हणाले, की महाराणा राज सिंह यांनी हवामहल बनविला होता. ते पाहून त्यांचा मुलगा जयसिंह यांनी जग पाहतच राहीन, अशी गोष्ट तयार करण्याचा निर्धार केला. तेव्हा हा कृत्रिम तलाव तयार करण्यात आला आहे.
पर्यटक निहारिका म्हणाल्या, की आम्ही जयसमंद तलाव पाहण्यासाठी आलो होतो. आम्हाला खूप छान वाटले. खूप स्वच्छ आणि व्यवस्थित तलाव आहे. पर्यटक पी. के. शर्मा म्हणाले, की हा देखावा खूप चांगला आहे. आम्ही करणी महलमध्ये थांबलो होतो.
हेही वाचा- चंद्रकांत पाटील यांना मानसिक उपचारांची गरज - अशोक चव्हाण
जयसमंद तलावाच्या किनाऱ्याजवळ प्राणी अभयारण्यदेखील आहे. तलावात नौकाविहारही करता येतो. जर तुम्हाला या कृत्रिम तलावाचे विहंगम दृश्य पाहायचे असेल तर या तलावांचे शहर असलेल्या उदयपूर शहर हे चांगले पर्यटनस्थळ आहे.