ETV Bharat / bharat

साडी घालून केले स्टंट; व्हिडिओ व्हायरल होताच झाली रातोरात स्टार - पारुल अरोरा व्हायरल व्हिडिओ

पारुलचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी तिचा शोध घेतला. पारुल ही हरियाणाच्या अंबालाची रहिवासी असून, राष्ट्रीय स्तरावरील जिमनॅस्ट खेळाडू आहे. पारुलने आतापर्यंत कित्येक स्पर्धांमध्ये भाग घेत मेडलही जिंकले आहेत. दोन वर्षांपूर्वी तिने जिम्नॅस्टिक सोडले होते, आता ती केवळ असे व्हिडिओ बनवतानाच जिमनॅस्ट स्टंट करते.

parul arora gymnastics video
साडी घालून केले स्टंट; व्हिडिओ व्हायरल होताच झाली रातोरात स्टार
author img

By

Published : Jan 11, 2021, 7:51 PM IST

चंदीगढ : साडी घालून सरळ चालणेही कित्येक जणींना जमत नाही, त्यातच एक मुलगी साडी घालून चक्क जिम्नॅस्टिक स्टंट करतानाचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, मोठमोठ्या सेलिब्रिटींनीही या व्हिडिओला शेअर केले आहे. पारुल अरोरा असे या तरुणीचे नाव आहे, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ती आता रातोरात स्टार झाली आहे.

गृहिणींना प्रेरणा देण्यासाठी बनवला व्हिडिओ..

पारुलने सांगितले, की साडी घालणाऱ्या गृहिणींना लोक 'चूल आणि मूल'मध्ये अडकलेल्या महिला समजतात. त्यांनी साडी घालणाऱ्या महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा, आणि गृहिणींनाही प्रेरणा मिळावी यासाठी आपण हा व्हिडिओ बनवल्याचे पारुलने सांगितले.

साडी घालून केले स्टंट; व्हिडिओ व्हायरल होताच झाली रातोरात स्टार

कोण आहे पारुल अरोरा?

पारुलचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी तिचा शोध घेतला. पारुल ही हरियाणाच्या अंबालाची रहिवासी असून, राष्ट्रीय स्तरावरील जिमनॅस्ट खेळाडू आहे. पारुलने आतापर्यंत कित्येक स्पर्धांमध्ये भाग घेत मेडलही जिंकले आहेत. दोन वर्षांपूर्वी तिने जिम्नॅस्टिक सोडले होते, आता ती केवळ असे व्हिडिओ बनवतानाच जिमनॅस्ट स्टंट करते.

संपूर्ण कुटुंबीयांना पारुलचा अभिमान..

पारुलची मोठी बहीण खुसबूही जिम्नॅस्टिक प्रशिक्षक आहे. त्यांनी कधी हा विचारच केला नव्हता, की साडी घालूनही जिम्नॅस्टिक करता येईल. जिम्नॅस्टिक स्टंट करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा पोषाख घालावा लागतो. मात्र, पारुलने साडी घालून हे स्टंट करुन दाखवल्यावर संपूर्ण कुटुंब आश्चर्यचकित झाले होते. आता पारुलचे सर्व स्तरातून होत असलेले कौतुक पाहून त्यांना तिचा अभिमान वाटतो आहे.

खेळामध्येही नोकऱ्या असाव्यात..

पारुलच्या वडिलांचे चहाचे दुकान होते. नंतर त्यांना दोन वेळा हृदविकाराचे धक्के बसल्याने हे दुकानही बंद झाले. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्येही आपल्या कुटुंबीयांनी आपल्या आवडीला प्रोत्साहन दिल्याचे पारुलने सांगितले. सरकारने खेळांशी संबंधित नोकऱ्या सुरू करण्यावर लक्ष द्यायला हवे, जेणेकरुन खेळाडू आपल्या शहरासाठी आणि देशासाठी काहीतरी करु शकतील.

हेही वाचा : विरुष्का झाले आई-बाबा, अनुष्काने दिला गोंडस मुलीला जन्म

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.