नवी दिल्ली : पंजाबमध्ये खलिस्तानचा मुद्दा स्वातंत्र्याच्या काळापासून आहे. त्यावेळी काही शीख नेत्यांना खलिस्तानच्या नावावर पंजाबची फाळणी हवी होती. पंजाबमध्ये खलिस्तानी चळवळ वेळोवेळी सक्रिय झाली. या काळात अनेक बडे खलिस्तानी नेते प्रकाशझोतात आले. या नेत्यांनी पंजाबला अस्थिर करून फाळणी करण्याचा कट रचला. पण त्यांचे मनसुबे यशस्वी झाले नाहीत.
गोपाळ सिंग चावला: अलीकडच्या काही दिवसांत, अमृतपाल सिंग याच्यासमोर करतारपूर कॉरिडॉरच्या पायाभरणी समारंभात 'खलिस्तानी चळवळ' पुन्हा उफाळून आली होती. तेव्हाच खलिस्तानी फुटीरतावादी नेता गोपाल सिंग चावला याचे नाव समोर आले. कार्यरत असलेल्या बड्या खलिस्तानी नेत्यांमध्ये त्याचाही समावेश होता. त्यावेळी पंजाबचे मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धूसोबतचे त्याचे फोटो समोर आले होते.
जगजीत सिंह चौहान: याआधी 1971 मध्ये जगजीत सिंह चौहान नावाची व्यक्ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्याने खलिस्तानी चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न केला. 1978 मध्ये जगजित सिंग याने अकालींसोबत आनंदपूर साहिबच्या नावाने ठराव पत्र जारी केले. यामध्ये वेगळ्या खलिस्तान देशाची मागणी करण्यात आली होती. जगजितसिंह चौहान याने अमेरिकेत या चळवळीला गती देण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेतील वर्तमानपत्रात जाहिराती देऊन त्याने हा मुद्दा वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याने हे आंदोलन लंडनला नेले. 1980 मध्ये लंडनमध्ये एक टपाल तिकीटही जारी करण्यात आले होते.
जनरेल सिंग भिंद्रनवाले: खलिस्तान चळवळीतील सर्वात प्रसिद्ध नाव जनरेल सिंग भिंद्रनवाले होते. 1980 च्या दशकात तो या चळवळीत सक्रिय राहिला. यादरम्यान त्याने परदेशात राहणाऱ्या अनेक शीखांना या चळवळीशी जोडले. लंडन, अमेरिकेसारख्या देशांमध्ये त्याने खलिस्तानी चळवळ वाढवण्याचा प्रयत्न केला. त्या शीखांच्या माध्यमातून त्यांना नंतर आर्थिक आणि सामरिक मदत मिळाली.
१९४७ पासूनच झाली सुरुवात: विशेष म्हणजे खलिस्तान चळवळ 1947 च्या सुमारास सुरू झाली. त्यावेळी काही शीख नेत्यांनी पंजाबचे विभाजन करण्याचा निर्धार केला होता. खलिस्तान नावाने वेगळा देश त्यावेळी त्यांना निर्माण करायचा होता. त्याच्या खलिस्तानमध्ये भारतातील पंजाबपासून पाकिस्तानातील लाहोरपर्यंत शीखबहुल भागाचा समावेश होता. यानंतर 1950 मध्ये अकाली दलाने या आंदोलनाला खतपाणी घातले. ही चळवळ 'पंजाबी सुबा आंदोलन' या नावाने चालवली गेली.