नवी दिल्ली Indira Ekadashi 2023 : हिंदू कॅलेंडरमध्ये एकादशीला खूप महत्त्व देण्यात आलंय. असं म्हणतात की, या दिवशी भगवान विष्णूचे व्रत आणि पूजा करण्याची परंपरा आहे, ज्यामुळं ते लवकर प्रसन्न होतात. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात. ही एकादशी पितृ पक्षात येते, म्हणून ती विशेष मानली जाते. यासंदर्भात अधिक माहिती देत ज्योतिषी शिवकुमार शर्मा म्हणाले की, या एकादशीचे शुभ परिणाम आहेत. या दिवशी उपवास केल्याने पितरांना मोक्षप्राप्ती होते. इंदिरा एकादशीच्या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करुन गरिबांना अन्न व वस्त्रही दान केलं जातं.
पूजेची पद्धत: इंदिरा एकादशीच्या दिवशी अंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. जर शक्य असेल तर नदीत अंघोळ करावी, अन्यथा घरात अंघोळ करतांना पाण्यात गंगाजल टाकावे. यानंतर पिवळे वस्त्र परिधान करुन सूर्यदेवाला नमन करावं. त्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या मूर्तींचा जलाभिषेक करून त्यांना फुलं अर्पण करून त्यांंना भोग लावावा. त्यानंतर एकादशी व्रताची कथा वाचून विष्णू चालिसाचे पठण करावं. शेवटी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आरती करून प्रसाद वाटप करावा.
शुभ वेळ: एकादशी तिथी सोमवार, 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:36 वाजता सुरू होईल आणि मंगळवार, 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:08 वाजता संपन्न होईल. यानंतर द्वादशी सुरु होईल. मात्र, उदयतिथी असल्यानं इंदिरा एकादशी 10 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे. द्वादशी तिथीसह येणारी एकादशी अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त 03:03 ते 04:30 पर्यंत असेल. तसंच, 11 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 6:19 ते 8:39 पर्यंत आपण उपवास सोडू शकतो.
- हे अवश्य करा : इंदिरा एकादशीच्या दिवशी विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करा, असं केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि त्यांचा विशेष आशीर्वाद मिळतो. वेळेची कमतरता असल्यास ओम नमो भगवते वासुदेवाय नमःसह श्री सूक्ताचे पठण करावे. यामुळे भगवान विष्णूंसोबत लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.
या गोष्टींकडे द्या विशेष लक्ष :
1. तामसिक अन्नाचे सेवन करू नये.
2. कोणत्याही प्रकारच्या औषधांच सेवन करू नये.
3. ब्रह्मचर्य पाळा.
4. अपशब्द वापरू नका.
हेही वाचा -
- Kamika Ekadashi 2023: कामिका एकादशीचे आज आहे व्रत, जाणून घ्या, महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धती
- Ashadhi Ekadashi 2023: छत्रपती संभाजीनगरमध्ये आषाढी एकादशी सोहळ्यात पोलीस सहभागी; गणवेशात जपली सामाजिक बांधिलकी, तर साध्या वेशात कर्तव्य पाडले पार
- Ashadi Ekadashi 2023 : हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन; जिल्ह्यात बकरी ईदचा उत्साह, जिल्ह्यात एकादशीला कुर्बानी देणार नाही