ETV Bharat / bharat

Dussehra Special सर्व वाईट शक्तींचे करा दहन, मात्र जाणून घ्या रावणातील हे '7' गुण

पौराणिक कथानुसार रावणाने तिन्ही लोकांवर विजय मिळवित देवांनाही बंदिस्त केले होते. दरवर्षी दसऱ्यानिमित्त रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले जाते. यानिमित्ताने रावणातील काही चांगले गुण जाणून घ्या.

7 good qualities in Ravana
7 good qualities in Ravana
author img

By

Published : Oct 14, 2021, 8:45 PM IST

Updated : Oct 14, 2021, 9:56 PM IST

भोपाळ - 15 ऑक्टोबरला दसरा आहे. संपूर्ण देशात उत्साहात रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले जाते. वाईट शक्तीवर चांगल्या शक्तींनी मिळविलेला विजय म्हणजे दसरा सण मानला जातो. असे असले तरी रावणातील काही चांगल्या गुणांचेही स्मरण केले जाते.

पौराणिक कथानुसार रावणाने तिन्ही लोकांवर विजय मिळवित देवांनाही बंदिस्त केले होते. दरवर्षी दसऱ्यानिमित्त रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले जाते. यानिमित्ताने रावणातील काही चांगले गुण जाणून घ्या.

हेही वाचा-पेट्रोलसह डिझेलच्या दरवाढीचा पुन्हा भडका; जाणून घ्या, आजचे दर

  1. 100 टक्के योगदान द्या - पौराणिक कथेनुसार रावण प्रत्येक गोष्ट ताकदीनिशी करत होता. उदाहरणार्थ शिवभक्ती. शंकराच्या महान भक्तामध्ये रावणाची गणना होती. रावणाने शिव तांडव स्त्रोत लिहिले होते. त्यामुळे रावण हा महान कवी होत असल्याची ओळख पटते. रावण हा भगवान शंकराचा रोज अभिषेक करत होता. रावणाने पूर्णपणे कैलाश पर्वत उचचल्याची आख्यायिका आहे.
  2. आत्मविश्वास ठेवा - रावणाला स्वत:च्या कमकुवत आणि शक्तिस्थानांची माहिती होती. श्रीरामाविरोधातील युद्धात रावणाने शक्तिशाली कुंभकर्ण आणि मुलगा मेघनाथ गमाविले होते. तरीही रावणाने हिंमत हरली नाही. आत्मविश्वासाने रावणाने युद्ध सुरू ठेवले होते.
  3. नात्यांना महत्त्व - भगवान श्रीरामाचे बंधू लक्ष्मणने रावणाची बहिण शूर्पणखाचे नाक कापले होते. पंचवटीत लक्ष्मणकडून अपमानित झाल्यानंतर शूर्पणखाने बंधू रावणाला व्यथा सांगितले. त्यानंतर रावणाने बहिणीचा बदला घेण्याचा निश्चय केला. रावणाने नेहमीच कुटुंबातील लोकांचे रक्षण केले. मात्र, त्याचा बदला घेण्याची पद्धत चुकीची होती.
  4. राजकारणाचे ज्ञान - रावण हा मृत्यूशय्यैवर होता. तेव्हा त्याच्यापासून राजकारणाचे ज्ञान घेण्यासाठी रामाने लक्ष्मणाला रावणाकडे पाठविले. तेव्हा लक्ष्मण रावणाच्या डोक्याजवळ बसला. तेव्हा रावण म्हणाला, शिकण्यासाठी डोक्याजवळ नाही, तर पायाजवळ बसावे. ही पहिली शिकवण आहे. रावणाने लक्ष्मणाला राजकारणाचे अनेक गुढ रहस्य सांगितले.
  5. आपली रहस्ये सांगू नयेत - रावणाने लक्ष्मणाला सांगितले, की आपली रहस्ये दुसऱयांना सांगू नयेत. रावणाच्या मृत्यूचे रहस्य बिभीषणला माहित होते. त्यामुळेच रामाला रावणाचा वध करता आला होता. रहस्य सांगणे ही जीवनातील सर्वात मोठी चुक असल्याचे रावणाने सांगितले.
  6. चांगला प्रशासक - रावणाने संघटित राक्षस समुदायाला एकत्रित आणून त्यांच्या कल्याणासाठी काही कार्य केले. रावणाच्या काळात जनता सुखी आणि समृद्ध होती. सर्व नियमांचे पालन होते.
  7. अनेक शास्त्रांची केली रचना - रावण हा मोठा शिवभक्त होता. त्याने शिव स्तुतीत तांडव स्त्रोत लिहिले होते. रावणाने अंक प्रकाश, इंद्रजाल, कुमारतंत्र, प्राकृत कामधेनू, प्राकृत लंकेश्वर, ऋगवेद भाष्य, रावणीयम, नाडी परीक्षा आदी पुस्तके लिहिली आहेत.

संबंधित बातमी वाचा-लंकाधिपती रावणाच्या जीवनातून 'हे' मिळतात 8 संदेश

Last Updated : Oct 14, 2021, 9:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.