नवी दिल्ली - भाजप नेते किरीट सोमैया यांनी दिल्लीत गृहसचिवांची भेट घेतली. 20 ते 25 मिनीट ही भेट झाली. यामध्ये राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर आम्ही चर्चा केली. ( Kirit Somaiya Met The Home Secretary ) त्यावर गृहसचिवांनी चिंता व्यक्त केली अशी माहिती सोमैया यांनी दिली आहे. यावर आम्हाला जे आवश्यक वाटेल ती कारवाई आम्ही करणार आहोत अशी ग्वाही गृहसचिवांनी आम्हाला दिली अशी माहितीही सोमैया यांनी दिली आहे. ते गृहसचिवांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलत होते.
मला माहण्याचा प्रयत्न - शिवसेनेकडून वारंवरा माझ्यावर हल्ला करण्यात आला आहे. त्यामध्ये मला कित्तेगदा मला मारण्याच प्रयत्न केला आहे. त्यावर गृहसचिवांनी एक कमिटी नेमून या प्रकरणासंदर्भात तपासणी करण्यासाठी राज्यात पाठवली जाईल अशी माहितीही सोमैया यांनी दिली आहे. ( Home Secretary Meet Kirit Somaiya ) दरम्यान, यावर राज्याचा गृहविभागही वारंवार दुर्लक्ष करत असल्याची माहितीही आपण गृहसचिवांना दिली आहे असही ते म्हणाले आहेत. येथे पोलिसांची मदत घेऊन मला माहण्याचा प्रयत्न केला असही सोमैया म्हणाले आहेत.
संविधानिक नियम पायदळी - राज्यात संविधानाला पाळले जात नाही. कोणत्याही कायद्याचे राज्य सरकारकडून पालन होत नाही. वारंवार खोट्या केस दाखल केल्या जातात. त्यामद्ये आम्हाला टार्गेट केले जाते अशी माहितीही गृहसचिवांना दिली आहे. त्यावर गृहसचिवांनी एका अधिकाऱ्याला राज्यात पाठवून पुर्ण सखोल चौकशी केली जाईल असही सोमैया बोलताना यावेळी म्हणाले आहेत.
माझ्यासह माझ्या बॉडीगार्डलाही मारण्याचा प्रयत्न - गृहचिवांनी सांगितले की ही वारंवार तक्रारी आल्या तर यावर कडक कारावाई करणार आहेत. तसेच, आयपीएस अधिकारी संजय पांडे या अधिकाऱ्याचीही चौकशी करणार आहोत असही त्यांना आश्वस्थ केल्याची माहिती आहे. यासोबतच, सोमैया यांनी माझ्यासह माझ्या बॉडीगार्डलाही मारण्याचा प्रयत्न केला अशी माहिती देण्यात आली आहे. त्यावरगी आवश्यक ती कारवाई करू असही त्यांना आश्वस्थ केले आहे अस सोमैया पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत.
हेही वाचा - झेलेन्स्की यांच्याकडून युद्ध संपवण्याची तयारी; पुतीन यांना भेटीची केली मागणी