भोपाळ : वेगवेगळ्या कारणांमुळे शहराची ओळख वेगवेगळ्या ठिकाणी राहिली आहे. भोपाळमधील शेळीपालकांचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते शेळ्यांना विविध प्रकारचे अन्न देतात. त्यामुळे बकरी ईदनिमित्त देशभरात भोपाळच्या बोकडांना मोठी मागणी असते. मुंबई-पुण्यापर्यंतचे लोक बकरी ईदला बळी देण्यासाठी भोपाळहून बकरे घेऊन जातात. यावेळी भोपाळमध्ये किंग नावाच्या बकऱ्याला या स्पर्धेत प्रथम क्रमांक घोषित करण्यात आला आहे.
बोकडांचा स्टेज शो : भोपाळमध्ये दरवर्षी बकरी ईदच्या आधी बोकडांचा स्टेज शो आयोजित केला जातो. ज्यामध्ये भोपाळ शहरातील शेळ्या, बोकड पाळण्याचे शौकीन लोक आपल्या शेळ्या, बकरे येथे आणतात आणि नंतर वजन आणि उंचीच्या आधारावर बोकडांना प्रथम क्रमांकापासून ते तीन क्रमांकापर्यंत बक्षीस घोषित केले जाते. या शोमध्ये मध्य प्रदेश राज्यातील अनेकजण सहभागी होत असतात. तसेच बकरी ईददरम्यान या व्यावसायातून करोडो रुपयांची उलाढाल होत असते.
मुंबईत देणार बळी - भोपाळमधील एका बकरी फार्ममध्ये आयोजित या कार्यक्रमात यावेळी किंग नावाच्या बोकडाचा पहिला क्रमांक आला आहे. विशेष म्हणजे या बोकडाचे वजन 176 किलो आहे. मुंबईत राहणाऱ्या एका व्यक्तीने 12 लाख रुपयांना हे बोकड विकत घेतले आहे.
कॅल्शियमचा डोस : फार्मचे संचालक सुहेल अहमद यांनी सांगितले की, ते बकरी ईदमध्ये कुर्बानीसाठी खास कोटा जातीचे बकरे आणतात आणि नंतर त्यांना खायला तयार करतात. या बोकडांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी त्यांना कुलरमध्ये ठेवण्यात आले असून, त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाते. वेळोवेळी डॉक्टरांना दाखवले जाते आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियमचा डोसही दिला जातो.
हेही वाचा -
- Hindu Muslim Unity : मुस्लिम हिंदू एकतेचे अनोखे उदाहरण; आषाढी एकादशी असल्याने ईदला 41 गावात होणार नाही कुर्बानी
- Ashadhi Ekadashi 2023: अनोखे हिंदु मुस्लिम ऐक्य, बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा 'या' गावात निर्णय
- Sheru Goat Passed Away : 1 कोटी 21 लाख रुपयांच्या शेरुचे बकरी ईद आधीच निधन, राज्यात रंगली होती शेरूच्या किंमतीची चर्चा