पाटणा Kidnapping Gang Marriage : बिहारमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळत आहेत. बीपीएससीच्या माध्यमातून मोठ्या संख्येनं शिक्षकांना नोकऱ्याही मिळाल्या आहेत. अशा स्थितीत अपहरण करुन लग्न लावून देणार्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. अपहरण करण्यात येणाऱ्या विवाहाचा ट्रेंड पुन्हा एकदा वाढलाय. अलीकडेच बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची भरती झालीय. तसंच शिक्षकांची गावोगावी नियुक्ती करण्यात आलीय. अशा स्थितीत अपहरण करुन लग्न लावणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.
अपहरण करुन लग्न लावणार्या टोळ्या सक्रिय : अपहरण करुन लग्न लावणार्या टोळ्या रेकी करुन सक्तीचे विवाहही सुरू झाले आहेत. स्थानिक भाषेत याला पाकडौवा लग्न असंही म्हणतात. नुकतंच वैशाली जिल्ह्यामध्ये जबरदस्तीनं लग्न केल्याचं प्रकरण समोर आलंय. वैशाली जिल्ह्यातील पाटेपूर इथं तैनात असलेल्या गौतम कुमार या शिक्षकाचं अपहरण करुन त्याच जबरदस्तीनं लग्न करण्यात आलं. पोलिसांनी खूप प्रयत्न केल्यानंतर शिक्षकाला यातून बाहेर काढता आलं.
बिहारमध्ये दरवर्षी सरासरी 3000 होतात असे लग्न : बिहारमध्ये दरवर्षी सरासरी 3000 पेक्षा जास्त लग्न हे अपहरण करुन लग्न लावणार्या टोळ्यांकडून होतात. आकडेवारीबद्दल बोलायचं झालं तर राज्य गुन्हे नोंद ब्युरोनं एक रेकॉर्ड जाहीर केला होता. त्यानुसार बिहारमध्ये 2020 मध्ये 7,194 जबरदस्ती विवाह, 2019 मध्ये 10,295, 2018 मध्ये 10,310 आणि 2017 मध्ये 8,927 अशी प्रकरणं नोंदवली गेली. त्यानंतर यातील अनेक बाबी परस्पर मिटवण्यात आल्या. पोलिसांच्या नोंदीनुसार, बिहारमध्ये दररोज सरासरी असे 9 लग्न होतात.
लग्नसराईच्या काळात पोलीस सतर्क : अशा प्रकारच्या वाढत्या घटनांमुळं पोलीस मुख्यालयानं सर्व जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना लग्नाच्या हंगामात सतर्क राहण्यास सांगितलंय. अपहरण करुन लग्न लावणार्या टोळी प्रकरणी पाटणा उच्च न्यायालयानं ऐतिहासिक निर्णय दिलाय. पाटणा उच्च न्यायालयानं 10 वर्षे जुना विवाह रद्द केला आहे. 10 वर्षांपूर्वी बंदुकीच्या धाकावर अपहरण करुन जबरदस्तीनं लग्न केल्याचा आरोप केला होता.
- तरुणांमध्ये भीतीचं वातावरण : एकीकडं लग्न करण्यासाठी सरकारी नोकरीवालेच वर हवेत अशी ओरड असताना दुसरीकडं बिहारमध्ये ही अनोखी टोळी सक्रीय झाली आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये तसंच सरकारी नोकरी करणाऱ्या तरुणांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.
हेही वाचा :