ETV Bharat / bharat

Minor Girls Kidnapping चार अल्पवयीन तरुणींना फूस लावून पळवले

उल्हासनगर पोलीस परिमंडळ हद्दीतील विविध तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार अल्पवयीन तरुणींना फूस लावून अज्ञात चार तरुणांनी अपहरण केल्याची minor girls kidnapped by youth खळबळजनक घटना घडली. विशेष म्हणजे अपहरण झालेल्या एका तरुणीचा पोलिसांनी शोध घेऊन तिची अपहरणकर्त्या तरुणाच्या तावडीतून सुटका Thane Police released kidnapped girl केली. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

author img

By

Published : Aug 14, 2022, 8:01 PM IST

minor girls kidnapped by youth in Thane
ठाणेमध्ये चार अल्पवयीन तरुणींना फूस लावून पळविले

ठाणे उल्हासनगर पोलीस परिमंडळ हद्दीतील विविध तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार अल्पवयीन तरुणींना फूस लावून अज्ञात चार तरुणांनी अपहरण केल्याची minor girls kidnapped by youth खळबळजनक घटना घडली. विशेष म्हणजे अपहरण झालेल्या एका तरुणीचा पोलिसांनी शोध घेऊन तिची अपहरणकर्त्या तरुणाच्या तावडीतून सुटका Thane Police released kidnapped girl केली. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र तीन तरुणींचा अद्यापही शोध सुरू आहे. Thane minor girls kidnapping

अपहरणकर्त्याला पोलीस कोठडी पहिल्या घटनेतील पीडित अल्पवयीन तरुणी १६ वर्ष ११ महिन्याची असून ती उल्हासनगर मधील ओटी सेक्शन परिसरात कुटूंबासह राहते. या पीडित तरुणीचे ती राहत असलेल्या परिसरातून कोणीतरी अज्ञात आरोपीने १३ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास अपहरण केल्याची तक्रार मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पीडितेच्या आईने दिली. घटनेची गांभीर्य ओळखून आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तिला उल्हासनगर मधील एका ठिकाणावून अपहरणकर्त्या तरुणासह सापळा रचून ताब्यात घेतले. करण ओमवीर गोहेर वय २२ वर्षे राहणार वाल्मिकी नगर उल्हासनगर कँम्प नंबर १ याला ताब्यात घेऊन अटक केली. तर पीडित तरुणीला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले. आज आरोपी करणला न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.

दोन दिवसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल दुसऱ्या घटनेतील पीडित अल्पवयीन तरुणी १६ वर्षाची असून ती उल्हासनगर मधील माणेरे गावात कुटूंबासह राहते. १० ऑगस्ट रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास ती राहत असलेल्या स्मशानभूमी समोरून बेपत्ता झाली होती. त्यानंतर पीडिता घरी आली नसल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला. मात्र दोन दिवस शोध घेऊनही ती सापडली नसल्याने अखेर १३ ऑगस्ट रोजी तिच्या आईने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलीचे कोणी तरी फूस लावून अपहरण केल्याची तक्रर दाखल केली. या तक्ररीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक एस यु बडे यांनी अज्ञात अपहरणकर्त्याचा शोध सुरु केला आहे.

उल्हासनगरमधील नेताजी चौक परिसरातून बेपत्ता तिसऱ्या घटनेतील पीडित १६ वर्षीय असून ती उल्हासनगर मधील कँम्प नंबर ५ भागातील बॅरेक मध्ये कुटुंबासह राहते. ती १३ ऑगस्ट रोजी सकाळी काही कामा निमित्ताने कॉलेजची बॅग घेऊन घरून निघाली होती. त्यावेळी सकाळी साडे दहा वाजता ती उल्हासनगर मधील नेताजी चौक परिसरातून बेपत्ता झाली. मुलगी दुपारनंतरही घरी आली नसल्याने तिच्या नातेवाईकांनी शोध सुरू केला. मात्र ती कुठेही आढळून आली नाही. त्यामुळे पीडितेच्या आईने रात्रीच्या सुमारास विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात आरोपी विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस पी बर्वे करीत आहेत.

पाच दिवसानंतरही शोध लागेना चौथ्या घटनेतील पीडित १४ वर्षे ७ महिन्याची असून ती बदलापूर पश्चिम मधील चिंतामण चौक बदलापूर गावात कुटूंबासह राहते. ७ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास ती कामानिमित्ताने घराबाहेर गेली होती. त्यावेळी दुपारी ३ वाजल्याच्या सुमारास ती बेपत्ता झाली. त्यामुळे नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला. मात्र ती कुठेही आढळून आली नाही. विशेष म्हणजे ५ दिवस तिचा नातेवाईक शोध घेत होते. अखेर तिच्या ३३ वर्षीय आईने बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलीचे कोणीतरी अज्ञात आरोपीने अपहरण केल्याची तक्रार १३ ऑगस्ट रोजी दाखल केली. या तक्रारीवरून अपहरणकर्त्याचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. बी. गोपाळ करीत आहेत.

हेही वाचा Husband Killed Wife पत्नीचे मुंडके धडापासून वेगळे करून पतीने काढला पळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.