पंजाब : श्री मुक्तसर साहिब सरकारी महाविद्यालयाच्या ( Govt College Sri Muktsar Sahib ) भिंतींवर 'खलिस्तान' समर्थनार्थ घोषणा ( Khalistan Zindabad ) लिहिण्यात आल्याचे समोर आले. खलिस्तान झिंदाबादच्या घोषनेमुळे इंदिराजींचा पराभव झाला होता आणि आता राहुल यांचा पराभव होईल, असे ही यावेळी लिहिण्यात आले होते. शीख फॉर जस्टिसचे प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून याला दुजोरा दिला.
भिंतींवर लिहिलेी घोषणा : पोलीस अधिकारी आणि महाविद्यालय प्रशासनाने भिंतींवर लिहिलेल्या घोषणा पुसल्या. याप्रकरणी तपास सुरू केला आहे. भटिंडा येथील गुरु नानक देव थर्मल प्लांटला लागून असलेल्या भिंतींवर यापूर्वी 'खलिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. शिख फॉर जस्टिसचे प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू यांनी याची जबाबदारी घेतली. यासोबतच भटिंडा शहरातील विभागीय वन अधिकारी कार्यालयाच्या बाहेरील भिंतीवर खलिस्तान समर्थक नारे लिहिलेले दिसले होते. स्प्रे पेंटने या घोषणा लिहिल्या होत्या.
वातावरण खराब करण्यासाठी: विस्कळीत, पंजाबचे वातावरण खराब करण्यासाठी टवाळखोर घटकांकडून भिंतींवर खलिस्तानचे नारे लिहिले जात आहेत. अलीकडे पंजाबमधील अनेक शहरांमध्ये खलिस्तानच्या बाजूने नारे लिहिल्याच्या घटना घडल्या आहेत. सहसा या घोषणा कोणत्याही सरकारी किंवा सार्वजनिक ठिकाणाजवळ लिहिल्या जातात, तर एका मंदिराच्या भिंतीवर खलिस्तान समर्थक पोस्टर लावल्याची घटना समोर आली आहे.