तिरुवनंतपुरम - केरळमध्ये शनिवारी, रविवारी पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे केरळमधील अनेक नद्यांना पूर आला आहे. या पुरात आणि विविध ठिकाणी झालेल्या भूस्खलनाच्या घटनांमध्ये आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनांच्या घटनांमध्ये 12 जण बेपत्ता झाले होते. लष्कर आणि एनडीआरएफच्या पथकांनी रविवारी सकाळी बेपत्ता नागरिकांचा शोध घेत त्यांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.
मदतीसाठी लष्कर, नौदल आणि हवाई दलाची मदत -
-
#KeralaRains
— SpokespersonNavy (@indiannavy) October 17, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Helo ops from #INSGaruda, #Kochi Southern Naval Command, being conducted for providing relief material to landslide affected areas in Koottickal, Kottayam.@SpokespersonMoD @DefenceMinIndia @DDNewslive @airnewsalerts @ndmaindia @HQ_IDS_India @adgpi @IAF_MCC https://t.co/EDg5BbATqp pic.twitter.com/65HByJOBXq
">#KeralaRains
— SpokespersonNavy (@indiannavy) October 17, 2021
Helo ops from #INSGaruda, #Kochi Southern Naval Command, being conducted for providing relief material to landslide affected areas in Koottickal, Kottayam.@SpokespersonMoD @DefenceMinIndia @DDNewslive @airnewsalerts @ndmaindia @HQ_IDS_India @adgpi @IAF_MCC https://t.co/EDg5BbATqp pic.twitter.com/65HByJOBXq#KeralaRains
— SpokespersonNavy (@indiannavy) October 17, 2021
Helo ops from #INSGaruda, #Kochi Southern Naval Command, being conducted for providing relief material to landslide affected areas in Koottickal, Kottayam.@SpokespersonMoD @DefenceMinIndia @DDNewslive @airnewsalerts @ndmaindia @HQ_IDS_India @adgpi @IAF_MCC https://t.co/EDg5BbATqp pic.twitter.com/65HByJOBXq
पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी लष्कर, नौदल आणि हवाई दलाची मदत घेतली जात आहे. नागरिकांच्या मदतीसाठी शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. या पावसाचा सर्वात जास्त फटका कोट्टायम, पठाणमथिट्टा आणि इडुक्की या तीन जिल्ह्यांना बसला आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट -
मुसळधार पावसामुळे केरळमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. इडुक्की, कोट्टायम आणि पथानामथिट्टा या भागातील नागरिकांना वीज आणि अन्य अजूनही उपलब्ध होत नाही. तसेच केरळ राज्य सरकारने धरण क्षेत्रात रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच केरळमधील पाच जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. पठाणमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की आणि त्रिशूर जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
पूर परिस्थितीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा -
केरळमधील भूस्खलनामध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच पूरपरिस्थितीचा मोदींनी आढावा घेतला आहे. तसेच केरळच्या मुख्यमंत्र्यांसोबतही पंतप्रधानांनी चर्चा केली आहे.
हेही वाचा - केरळमध्ये पावसाचा हाहाकार : पाहा थरकाप उडवणारी दृश्य