ETV Bharat / bharat

केरळात काँग्रेसचा जाहीरनामा; गरीबांसाठी पाच लाख घरे बांधण्याचे आश्वासन - केरळात काँग्रेसचा जाहीरनामा

काँग्रेसप्रणीत यूडीएफने शनिवारी आपला जाहीरनामा ‘पीपल्स मॅनिफेस्टो’ जाहीर केला. नव्या घोषणापत्रानुसार, सर्व श्वेत कार्डधारकांना पाच किलो तांदूळ मोफत देण्याचे आणि गरीबांसाठी पाच लाख घरे बांधण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

केरळ
केरळ
author img

By

Published : Mar 21, 2021, 2:45 PM IST

कोची - केरळात एप्रिलला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसप्रणीत यूडीएफने शनिवारी आपला जाहीरनामा ‘पीपल्स मॅनिफेस्टो’ जाहीर केला. नव्या घोषणापत्रानुसार, सर्व श्वेत कार्डधारकांना पाच किलो तांदूळ मोफत देण्याचे आणि गरीबांसाठी पाच लाख घरे बांधण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यूडीएफने शबरीमालाच्या भगवान अयप्पा मंदिराच्या परंपरेचे रक्षण करण्यासाठी आणि राजस्थानच्या धर्तीवर शांतता व सौहार्द विभाग तयार करण्याचे विशेष कायदे करण्याचे आश्वासनही जनतेला दिले आहे.

महिलांना आकर्षित करण्यासाठी पक्षाने सरकारी नोकरीसाठी परीक्षा घेऊ इच्छिणाऱ्या मातांना वयोमर्यादेत दोन वर्षाची सवलत देण्याचे आश्वासन दिले आहे. कोरोनाने प्रभावित झालेल्या लोकांना मोफत फूड पॅकेट्स इत्यादी सुविधा देण्याचेही जाहीरनाम्यात म्हटलं आहे. सत्ताधारी एलडीएफने सामाजिक सुरक्षा पेन्शन 1600 रुपयांवरून वाढवून 2,500 रुपयांपर्यंत वाढविण्याबरोबरच रोजगार नसलेल्या गृहणींना पेन्शन देण्याचे आश्वासन देखील दिले आहे.

केरळ विधानसभा निवडणूक -

केरळ विधानसभेत 140 जागांसाठी 6 एप्रिल 2021 मतदान होईल. तर निवडणुकीचे निकाल 2 मे 2021 ला लागतील. राज्याची ही 15 वी विधानसभा निवडणूक असणार आहे. 2021 मध्ये 140 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपा पाय रोवण्याचा प्रयत्न करेल. सध्या केरळात माकपाच्या नेतृत्वात डावे पक्ष सत्तारुढ आहेत. सत्तेत येण्यासाठी भाजपाकडूनही जोरदार तयारी सुरू आहे.

मागील निवडणूकीतील संख्याबळ -

केरळ विधानसभेत एकूण 140 जागा आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत एलडीएफने (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष) 91 जागांवर विजय मिळवला होता. यूडीएफने (संयुक्त लोकशाही आघाडी) 47 जागा जिंकण्यात यश मिळवलं होतं. तर भाजपला एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं. भाजपाने एकूण 98 जागांवर आपले उमेदवार उतरवले होते.

हेही वाचा - काँग्रेसचा जाहीरनामा, आसामच्या परंपरा आणि संस्कृतीचे रक्षण करण्याचे वचन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.