तिरुवनंतपुरम - स्वत:चे अधिक चांगले संरक्षण करण्यासाठी बंदुक असण्याची गरज तुम्हाला वाटते. पण, बंदुक वापरण्याचे कौशल्य तुमच्याकडे नाही? तर तुम्ही काय करणार आहात. केरळ पोलीस तुम्हाला बंदूक वापरण्याचे प्रशिक्षण देतील. मात्र, यासाठी तुम्हाला ५ हजार रुपये मोजावे लागतील. केरळचे डीजीपी अनिल कंठ यांनी आज मंगळवार (दि. 7 जुन)रोजी या संदर्भात अधिकृत आदेश जारी केला आहे. जिथे पोलीस नागरिकांना बंदूक हाताळण्याचे प्रशिक्षण देऊ शकतात. ज्यांच्याकडे आधीच बंदुकीचा परवाना आहे आणि ज्यांनी त्यासाठी अर्ज केला आहे ते या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
ज्या लोकांना बंदुका वापरण्याचा अनुभव नाही, त्यांना 5000 रुपये द्यावे लागतील. ज्यांना बंदूक हाताळण्याचे थोडेसे ज्ञान आहे परंतु त्यांना अधिक प्रशिक्षण हवे आहे. त्यामुळे त्यांना एक हजार रुपये द्यावे लागणार आहेत. मात्र, या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, निवड प्रक्रिया कठोर असेल आणि प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या सर्वांची निवड केली जाणार नाही. निवड करण्यापूर्वी, तज्ञ अर्जदाराच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे विश्लेषण करतील आणि कठोर निकषांमध्ये उत्तीर्ण झालेल्यांनाच प्रशिक्षणासाठी निवडले जाईल.
या निवड चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्यांनाच प्रशिक्षण दिले जाईल, असा पोलिसांचे मत आहे. जेणेकरून बंदुकीचा गैरवापर होण्याची शक्यता राहणार नाही. अलीकडे, एका व्यक्तीने केरळ उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाची मागणी केली, की अनेक बंदूक परवानाधारकांना ते कसे हाताळायचे हे माहित नाही. त्यानंतर उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश दिले होते. डीजीपीचा आदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाशी सुसंगत आहे.
हेही वाचा - Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी दिवंगत सिद्धू मूसेवाला यांच्या कुटुंबाचे केले सांत्वन