ETV Bharat / bharat

Formula One Racing : आंतरराष्ट्रीय फॉर्म्युला वन रेसिंग चॅम्पियनशिपमध्ये केरळची मुलगी साल्वा मर्जान उमटवणार ठसा

Formula One Racing : केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील साल्वा मर्जान या मुलीला फॉर्म्युला वन कार रेसिंगमध्ये आंतरराष्ट्रीय चॅम्पियन बनायचंय. तसंच हे ध्येय साध्य करण्यासाठी साल्वा खूप मेहनत घेत आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 3, 2023, 12:31 PM IST

International Formula One Racing Championship
आंतरराष्ट्रीय फॉर्म्युला वन रेसिंग चॅम्पियनशिपमध्ये केरळची मुलगी साल्वा मर्जान उमटवणार ठसा

कोझिकोड (केरळ) International Formula One Racing Championship : केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील एका डोंगराळ खेडेगावातील एक मुलगी आंतरराष्ट्रीय फॉर्म्युला वन रेसिंग चॅम्पियनशिपमध्ये ठसा उमटवण्यासाठी कठोर सराव करत आहे. चक्कीटपाराच्या चेम्बरा येथील मूळ रहिवासी असलेल्या साल्वा मर्जानने पुरुष खेळाडूंचं वर्चस्व असलेल्या मोटर स्पोर्ट्समध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे.

भारताची पहिली महिला आंतरराष्ट्रीय रेसर बनण्यासाठी मेहनत : चेन्नईत 4 आणि 5 नोव्हेंबरला होणाऱ्या F4 कार रेसिंग चॅम्पियनशिपमध्ये ती सहभागी होणार आहे. तसंच 23 वर्षीय साल्वा ही अत्याधुनिक हॅलो सुरक्षा यंत्रणांसह चॅम्पियनशिपसाठी तयारी करत आहे. यूएई फॉर्म्युला रेसिंग चॅम्पियनशिप आणि ब्रिटन फॉर्म्युला चॅम्पियनशिपसाठी दुबईमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर चेन्नईला आलेली साल्वा भारताची पहिली महिला आंतरराष्ट्रीय रेसर बनण्यासाठी खूप मेहनत घेत असल्याचं बघायला मिळतंय.

आठ वर्षांपासून करत आहे सराव : चेंबरा पंचिंगल कुंजामू आणि सुबैदा दाम्पत्याची मुलगी साल्वा हिनं लहान वयातच गाडी चालवण्यात रस दाखवला. गेल्या आठ वर्षांपासून ती रेसिंग ट्रॅकची चॅम्पियन बनण्यासाठी स्वतःला तयार करत असून तिचं आठ वर्षांचं स्वप्न सत्यात उतरवण्याची हीच वेळ आहे. DTS रेसिंगमधील फॉर्म्युला LGB, सिंगल सीटर, ओपन व्हील क्लास रेस कारसह प्रवास सुरू केलेल्या साल्वाची आवड आणि तिच्या कौशल्यांमुळं तिला या खेळात उत्कृष्ट कामगिरी करता आली. आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकण्याचे साल्वाचे ध्येय असून फॉर्म्युला रेसिंगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याच्या तिच्या अंतिम ध्येयाकडे ती अभिमानाने वाटचाल करत आहे.

तिन्ही शर्यती समान अंतराच्या : साल्वा प्रथम चेन्नई F4 रेसिंग चॅम्पियनशिपमधील पात्रता सत्रात सहभागी होणार आहे. या फॉर्म्युला 4 शर्यतीत तीन शर्यती होतील. तिन्ही शर्यती समान अंतराच्या असतील. तर हे अंतर फॉर्म्युला 2 आणि फॉर्म्युला 3 मध्ये वेगळे असेल. F4 नंतर, साल्वा F3, F2 आणि शेवटी F1 द्वारे सर्वोच्च स्तरावर स्पर्धा करण्यासाठी तयार होईल. त्यासाठी तिला ही शर्यत जिंकावी लागणार आहे. त्यानंतर ती F3, F2 आणि नंतर F1 अशा उच्च स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करेल.

हेही वाचा -

  1. Kerala Blast : केरळमधील बॉम्बस्फोटानंतर संपूर्ण भारतात हाय अलर्ट; NSG, NIA च्या टीम तपासासाठी पोहचल्या
  2. Kerala Blast : केरळ बॉम्बस्फोटातील आरोपीचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण, केले अनेक खुलासे; जाणून घ्या का केले स्फोट?
  3. Kerala High Court : बाळाचं नाव ठेवण्यावरुन दाम्पत्यात भांडण, अखेर उच्च न्यायालयानं केलं नामकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.