ETV Bharat / bharat

Kejriwal Visit Punjab : पंजाबमध्ये सरकार आल्यास स्वच्छता कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करू; केजरीवालांचे आश्वासन - पंजाब विधानसभा निवडणूक 2022

सध्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाब दौऱ्यावर (Arvind Kejriwal Punjab Visit) आहेत. अमृतसरमध्ये केजरीवाल यांनी 'पंजाबमध्ये आमचे सरकार आल्यास येथील कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांना नोकरीत कायमस्वरुपी करू, असे आश्वासन दिले आहे.

Arvind Kejriwal
अरविंद केजरीवाल
author img

By

Published : Jan 1, 2022, 9:01 PM IST

अमृतसर (पंजाब) - पंजाब विधानसभा निवडणूक 2022 (Punjab Assembly Election 2022) साठी सर्वच पक्षांनी पूर्ण जोर लावला आहे. आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाब दौऱ्यावर (Arvind Kejriwal Punjab Visit) आहेत. अमृतसरमध्ये केजरीवाल यांनी 'पंजाबमध्ये आमचे सरकार आल्यास येथील कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांना नोकरीत कायमस्वरुपी करू आणि त्यांना सर्व सुविधा दिल्या जातील, असे आश्वासन दिले आहे. तसेच गटारांची साफसफाई करण्यासाठी या कर्मचाऱ्यांना आम्ही अत्याधुनिक मशीन देऊ, असे आश्वासन केजरीवाल यांनी दिले आहे.

  • केजरीवाल यांची सरकारवर टीका -
    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल पंजाबमध्ये नियमित सभा घेत आहेत. केजरीवाल आज अमृतसरला पोहोचले आणि रामतीर्थ मंदिरात भगवान वाल्मिकींचे त्यांनी दर्शन घेतले. पुरेशा सार्वजनिक सुविधांच्या अभावावर केजरीवाल यांनी यावेळी सरकारवर निशाणा साधला. केजरीवाल म्हणाले की, स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही भारतात चांगले शिक्षण आणि चांगल्या आरोग्य सुविधा नाहीत, त्यामुळे मुले शिक्षणापासून वंचित राहिली आहेत. तसेच अनेक नागरिक उपचारापासून वंचित आहेत.

देशातील सरकारी शाळांच्या दुरावस्थेला सर्वस्वी नेतेच जबाबदार असल्याचे केजरीवाल म्हणाले. ते म्हणाले की, आम आदमी पार्टीने शपथ घेतली आहे की ज्याप्रमाणे भारतातील श्रीमंत लोकांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळते, त्याचप्रमाणे आमच्या सरकारच्या काळात राज्यातील प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण दिले जाईल. तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे लक्ष दिले जाईल. पंजाबमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे कोणत्याही सरकारने लक्ष दिलेले नाही, 2022 मध्ये पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यास स्वच्छता कर्मचाऱ्यांना नोकरीत कायमस्वरुपी केले जाईल, असे आश्वासन केजरीवाल यांनी आज दिले आहे.

  • केजरीवाल यांनी पंजाबच्या जनतेला दिलेले आश्वासन -

1) दलित समाजातील सर्व मुलांना मोफत शिक्षण दिले जाईल.

2) श्राइन बोर्ड बरखास्त केले जाईल.

3) स्वच्छता कर्मचाऱ्यांना नोकरीत कायमस्वरुपी केले जाईल.

4) स्वच्छता कर्मचाऱ्यांना मशीन किट दिले जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.