ETV Bharat / bharat

International Womens Day : कर्नाटकातील 60 वर्षीय लक्ष्मम्मा यांनी 5,000 हून अधिक मृतदेहांवर केले अंत्यसंस्कार - कर्नाटक

कर्नाटकातील बंगळुरू ग्रामीणमधील दोड्डाबल्लापुरा शहराजवळील मुक्तिधाममध्ये लक्ष्मम्मा नावाच्या ६० वर्षीय महिलेने आतापर्यंत पाच हजारांहून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. जागतिक महिला दिना निमित्त जाणून घेऊया सविस्तर बातमी.

International Womens Day
कर्नाटकातील 60 वर्षीय लक्ष्मम्मा
author img

By

Published : Mar 8, 2023, 7:15 PM IST

लक्ष्मम्मा यांनी आतापर्यंत 5,000 हून अधिक मृतदेहांवर केले अंत्यसंस्कार

दोड्डाबल्लापुरा (बेंगळुरू ग्रामीण): कर्नाटकातील बेंगळुरू ग्रामीण अंतर्गत डोड्डाबल्लापुरा शहरापासून सुमारे तीन किमी. दूरवर असलेल्या मुक्तिधाममध्ये (स्मशानभूमी) लक्ष्मम्मा नावाच्या महिलेने आतापर्यंत पाच हजारांहून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. 2001 मध्ये शहरातील देवांग मंडळाच्या प्रयत्नातून मुक्तिधाम सुरू करण्यात आला होता. तेव्हापासून 60 वर्षीय लक्ष्मम्मा यांनी त्यांचे पती उमाशंकर यांच्यासह मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली.

मिळतो केवळ 6 रुपये महिना : सात वर्षांपूर्वी लक्ष्मम्मांच्या पतीच्या निधनानंतर, लक्ष्मम्मांनी एकट्याने या कामाची जबाबदारी घेतली. त्या दररोज एक किंवा दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करते. मृतदेह मुक्तीधाम येथे पोहोचण्यापूर्वी मृतदेह जाळण्यासाठी तयार केलेल्या पेटीची व्यवस्था केली जाते. त्यानंतर मृतदेह आल्यानंतर त्यामध्ये मृतदेह ठेवला जातो आणि नंतर लाकडे ठेवली जातात. त्याचवेळी मृतदेह पूर्णपणे जळण्यासाठी पाच ते सहा तास लागतात. यादरम्यान लक्ष्मम्मा मृतदेह पूर्णपणे जळे पर्यंत थांबतात. दुसरीकडे, देवांग मंडळाने दिलेले मासिक सहा रुपये आणि मृतांच्या नातेवाइकांकडून मिळालेल्या पैशावर लक्षम्माचा उदरनिर्वाह सुरू आहे.

मिळालेत अनेक पुरस्कार : ईटीव्ही भारतशी बोलताना लक्ष्मम्मा म्हणाल्या की, 'कोविडच्या काळात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे हे मोठे आव्हान होते. अगदी जवळचे नातेवाईकही मृतदेहाला हात लावायला घाबरत होते. अशा संकटकाळात मी कोणत्याही अतिरिक्त संरक्षणाशिवाय मुखवटा घालून हे काम पार पाडले. त्यांनी सांगितले की, त्या काळात ती एका दिवसात 7 ते 10 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायची. लक्ष्मीमामा म्हणाल्या की इथले जीवन असेच चालते, मला कसलीही भीती नाही, या कामातून मला शांती मिळते. लक्ष्मम्मा म्हणाल्या की, मृताच्या नातेवाईकांशिवाय तिने स्वत: अनेक वेळा मृतदेहाचे अंतिम संस्कार केले. लक्ष्मम्माला त्यांच्या सेवेसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच तालुका प्रशासन व जिल्हा प्रशासन व इतर संघटना व संस्थांनी दुर्मिळ सेवेचा गौरव म्हणून पुरस्कार दिले आहेत. आज जागतिक महिला दिनानिमित्य ईटीव्ही भारतने या लक्ष्मम्माचे कार्य सगळ्यांपूढे आणले. महत्वाचे म्हणजे मिळेल त्या पैशात असले कार्य करण्याचे धाडस आणि समर्पण लक्ष्मम्मा शिवाय इतर कुणी करणारे क्वचितच सापडेल.

हेही वाचा : International Women's Day 2023 special: जागतिक महिला दिनाच्या दिवशी जाणून घ्या इतरही प्रतिभावान महिलांविषयी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.