मंगळुरु (कर्नाटक) : रविवारी पहाटे कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सुल्लाई तालुक्याच्या विविध भागात भूकंपाचे धक्के ( Tremors felt again in Dakshina Kannada district ) जाणवले. कालच कर्नाटकात ४.६ रिस्टर स्केलचा भूकंप जाणवला होता. त्याचे धक्के महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातही जाणवले होते. त्यानंतर आज पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले ( Tremors Felt Again In Karnataka ) आहेत.
मोठा आवाज होऊन भूकंप : तालुक्यातील संपाजे आणि जवळपासच्या भागातील अरंटोडू, थोडीकाना, चेंबू आणि कल्लापल्ली येथील रहिवाशांना सकाळी 6.23 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. सोशल मीडियावरही भूकंपाच्या पोस्ट्स दिसू लागल्या. संपाजे ग्रामपंचायतीचे अध्यक्ष जी के हमीद यांनी सांगितले की, मोठा आवाज होऊन काही काळ पृथ्वी हादरली. अलिकडच्या काळात जाणवलेल्या भूकंपापेक्षा हे धक्के अधिक तीव्र होते, असे ते म्हणाले.
अहवालाची प्रतीक्षा : एका आठवड्यापेक्षा जास्त कालावधीनंतर या भागात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. 25 जून ते 1 जुलै दरम्यान सुलिया आणि शेजारच्या कोडागु जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. रविवारच्या भूकंपाच्या कर्नाटक राज्याच्या राष्ट्रीय आपत्ती निरीक्षण केंद्राच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
अपडेट होत आहे..
हेही वाचा : Mild tremors in Solapur: सोलापूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; कर्नाटकमध्ये 4.9 रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप