ETV Bharat / bharat

Bhagavad Gita in schools, colleges कर्नाटकात यावर्षीपासून शालेय अभ्यासक्रमात भगवत गीतेचे अध्यापन - शाळा आणि महाविद्यालयांमध्ये भगवद्गीतेचे अध्यापन

कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी सोमवारी जाहीर केले की, राज्य सरकार या शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये भगवद्गीतेचे अध्यापन ( Bhagavad Gita in schools colleges ) सुरू करण्याचा विचार करत आहे.

Bhagavad Gita in schools
Bhagavad Gita in schools
author img

By

Published : Sep 19, 2022, 5:56 PM IST

बंगळुरू : कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी सोमवारी जाहीर केले की, राज्य सरकार या शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये भगवद्गीतेचे अध्यापन ( Bhagavad Gita in schools colleges ) सुरू करण्याचा विचार करत आहे. नागेश यांनी विधानसभेच्या अधिवेशनात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही प्रतिक्रिया दिली.

आम्ही या शैक्षणिक वर्षापासून भगवद्गीतेचे शिक्षण सुरू करण्याचा विचार करत आहोत. ती नैतिक विज्ञान विषयांतर्गत शिकवली जाईल. त्यावर चर्चा सुरू आहे. एक समिती स्थापन केली जाईल आणि लवकरच निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.

भाजपच्या सदस्याचेच सवाल - कर्नाटकमध्ये विद्यार्थ्यांना भगवद्गीतेची शिकवण लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे का, भगवद्गीता शिकवण्यास सरकार कचरत आहे का? याआधी यासंदर्भातील वक्तव्ये जारी करताना सरकारने दाखवलेले स्वारस्य का वाया गेले?, असा सवाल भाजपचे आमदार एम. के. प्रणेश यांनी विचारला होता. त्यावर मंत्र्यांनी उत्तर दिले.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले होते की, नैतिक विज्ञान विषयाचा भाग म्हणून भगवद्गीता अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची त्यांच्या सरकारची भूमिका आहे. अवजड आणि मध्यम उद्योग मंत्री मुरुगेश निरानी यांनी सांगितले की भगवद्गीतेमध्ये मानवी मूल्ये आहेत आणि मुलांनी ती मूल्ये शिकणे आवश्यक आहे.

गुजरात सरकारने भगवद्गीता अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे आणि कर्नाटकातही मुलांना भगवद्गीतेची ओळख करून देण्याचा निर्णय घेण्यात यावा, असेही निरानी म्हणाले. तथापि, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि म्हैसूरचे माजी मंत्री, तन्वीर सैत यांनी आठवड्याच्या शेवटी, "कोविड साथीच्या आजारापेक्षा "भगवद्गीतेचा अभ्यासक्रमात समावेश करणे धोकादायक आहे" असे सांगून वाद निर्माण केला होता.

माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी या प्रस्तावावर राज्य सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. ते म्हणाले की, भगवद्गीतेच्या शिकवणीने भुकेल्यांचे पोट भरणार नाही. राज्य हजारो समस्यांना तोंड देत आहे आणि भगवद्गीतेची शिकवण लोकांना अन्न पुरवणार नाही. देशात भावनिक बाबींना महत्त्व प्राप्त होत आहे. निरपराधांची दिशाभूल केली जात आहे. ही प्रवृत्ती संपुष्टात आणायची वेळ आली आहे आणि तोपर्यंत आम्ही प्रतीक्षा करू, असेही ते म्हणाले.

विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या म्हणाले आम्ही हिंदू धर्मावर विश्वास ठेवतो आणि इतर धर्मांना समान आदर देतो. मुलांना भगवद्गीता, बायबल, कुराण शिकवण्यास आमचा कोणताही आक्षेप नाही. पण, मुलांना दर्जेदार शिक्षण दिले पाहिजे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.