बेंगळुरू : कर्नाटक सरकारनं शनिवारी अटीबेले इथं एका फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत मरण पावलेल्या 14 लोकांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. बंगळुरूच्या बाहेरील अणेकल तालुक्यातील अटीबेले इथं आगीची घटना घडली. या आगीतून चार जणांना वाचण्यात यश आलं आहे.
5 लाख रुपयांची मदत : अग्निशमन विभागानं नंतर आग आटोक्यात आणली. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी शनिवारी रात्री उशिरा घटनास्थळी भेट दिली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या १३ जणांच्या कुटुंबीयांना त्यांनी 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली. आगीत आणखी काही लोक अडकले असण्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार, बहुतांश कामगार तामिळनाडूतील आहेत. शिवकुमार म्हणाले, "दुकानात खरेदीसाठी आलेल्या लोकांचाही आगीच्या घटनेत मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. या घटनेमागचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास करण्यात येणार आहे. गोदामासाठी परवानगी घेण्यात आल्याचं माहिती मिळते आहे."
13 कामगारांचा जळून मृत्यू : या घटनेबद्दल शोक व्यक्त करतांना माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, आणेकल फटाक्यांच्या गोदामात झालेल्या दुर्घटनेत 13 कामगारांचा जळून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरू- ग्रामीण एसपी मल्लिकार्जुन बलदंडी यांनी सांगितलं की, बालाजी फटाक्यांच्या गोदामात कॅन्टरमधून फटाके उतरवत असताना आग लागली. आग नंतर गोदामासह इतर ठिकाणी पसरली. “आम्ही फटाक्यांच्या गोदामाचा परवाना तपासत आहोत,”. या घटनेत कोट्यवधी रुपयांचे फटाके जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत तीन चारचाकी, चार दुचाकीही जळाल्या आहेत.
आणखी कर्मचारी अडकले असण्याची भीती : या संपूर्ण घटनेबाबत बंगळुरू ग्रामीणचे एसपी मल्लिकार्जुन बलदंडी यांनी सांगितलं की, बालाजी क्रॅकर्स गोदामात कॅंटर वाहनातून फटाके उतरवताना हा अपघात झाला. काही वेळातच गोदामाला आग लागली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या घटनेत गोदामाचे मालक नवीन हे देखील भाजले आहेत. आग पूर्णपणं विझल्यानंतरच गोदामात किती कर्मचारी अडकले आहेत हे कळेल. एफएसएल टीम पडताळणीसाठी येईल. आम्ही गोदामाचा परवाना तपासत आहोत, असं बंगळुरू ग्रामीणच्या एसपींनी सांगितलं.
हेही वाचा -
Bengaluru Godown Fire : बेंगळुरूमध्ये फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग, ११ जणांचा मृत्यू