ETV Bharat / bharat

Congress Majority For Karnataka : कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत, 136 जागांवर विजय

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकालात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. राज्यात भाजपचे पानिपत झाले असुन काँग्रेसने 136 जागांवर विजय मिळवला आहे. तसेच भाजप फक्त 65 जागा पर्यंतच मर्यादित राहीले आहे. तर जेडीएसने 19 जागांवर विजय संपादन केला आहे. 4 जागांवर इतर उमेदवार विजयी झाले आहेत.

Grand verdict of Karnataka Live Update
Grand verdict of Karnataka Live Update
author img

By

Published : May 13, 2023, 6:20 AM IST

Updated : May 13, 2023, 5:34 PM IST

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तसेच त्यांची घोडदौड सुरू आहे. काँग्रेसने 136 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपने 65 जागांवर विजय मिळवला आहे. तसेच जेडीएसने 19 जागावर विजय मिळवला आहे. तर अन्य उमेदवारांनी 4 जागांवर विजयाची मोहर उमटवली आहे. आत्तापर्यंत सर्व 224 जागांचा निकाल हाती आला हाती आला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी आता कुणाची वर्णी लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांच्यापैकी कुणाच्या गळ्यात मुख्यमत्रीपदाची माळ पडते ते पाहावे लागेल.

मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसने नवीन फॉर्म्यूला तयार : सुत्रांच्याकडून मिळत असलेल्या माहितीवरुन कर्नाटकात मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसने नवीन फॉर्म्यूला तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये पहिले अडिच वर्षे सिद्धरामय्या आणि पुढची अडिच वर्षे डी के शिवकुमार मुख्यमंत्री होतील अशी चर्चा आहे. प्रत्यक्ष काँग्रेस काय निर्णय घेते त्यावरच पुढील भवितव्य अवलंबून आहे. सध्या काँग्रेसच्या अध्यक्षपदी कर्नाटकातील नेते असलेले मल्लिकार्जुन खरगे आहेत. त्यांच्या राज्यात काँग्रेसची स्पष्ट बहुमताने सत्ता येत असल्याने जेवढे यशाचे श्रेय राहुल गांधी यांना देण्यात येत आहे. तेवढेच श्रेय खरगे यांनाही देण्यात येत असल्याचे दिसत आहे.

काँग्रेसला स्पष्ट बहुमत : कर्नाटकमध्ये एक्झिट पोलमध्ये काँग्रेसची आघाडी जवळ-जवळ सर्वांनीच वर्तवली होती. तसेच या निवडणुकीत जेडीएसला महत्व येईल असा होरा होता. मात्र, निकालाचे कल पाहता काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. काँग्रेसच्या कर्नाटकातील सर्वच भागातील उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर भाजपला या निवडणुकीत मोठा फटका बसल्याचे कलांच्यावरुन दिसून येत आहे. हेच कल शेवटपर्यंत राहतील असाच अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या राहुल गांधी यांची भारत जोडोची जादू चालली अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. एकीकडे पप्पू म्हणून हिणवण्यात येणारे राहुल गांधी कर्नाटकात जंटलमन झाल्याचेच हे प्रतिक असल्याचे काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना वाटत आहे.

काॅंग्रेसचा 134 जागांवर विजय : काँग्रेसने मॅजिक फिगरच्या पुढे जाऊन 134 जागांवर विजय मिळवला आहे. सध्याची मतमोजणी पाहता काँग्रेसला मोठे यश या निवडणुकीत मिळताना दिसत आहे. पक्षाने आमदारांची बैठकही बोलावल्याचे वृत्त आहे. त्यामध्ये सत्तास्थापनेच्या पुढील गोष्टींची चर्चा होण्याची शक्यता आहे.

भाजपने 224 उमेदवार उभे केले. काँग्रेसने 223 उमेदवार उभे केले आहेत. जेडीएस पक्षाकडून एकूण 209 उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. आम आदमी पक्षाकडून २०९ उमेदवार निवडणूक लढले. बसपाकडून 133 उमेदवार निवडणूक लढले आहेत. कर्नाटक राष्ट्र समितीमधून 195 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. इतर नोंदणीकृत राजकीय पक्षांचे 254 उमेदवार रिंगणात आहेत. तर 918 अपक्ष उमेदवार रिंगणात होते.

  • हेही वाचा
  1. Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात भाजप-काँग्रेसचा बहुमताचा दावा, 'जेडीएस'ची राहील कळीची भूमिका
  2. Karnataka Elections Results : कर्नाटक निवडणूक निकालावर मोठी भविष्यवाणी, वाचा कोण करणार सरकार स्थापन
  3. Sharad Pawar for MVA stronger : महाविकास आघाडी मजबुतीची शरद पवारांची हाक, अजित पवारांचा पुन्हा स्वप्नभंग

Last Updated : May 13, 2023, 5:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.