मुंबई : आजचा दिवस काँग्रेससाठी आनंदाचा तर भाजपासाठी दु:खाचा ठरला आहे. सर्वशक्तीमान समजणाऱ्या भाजपाला काँग्रेसने धूळ चारली. कर्नाटकातील सत्ता आपल्याकडे राहावी, यासाठी पंतप्रधान मोदींनी आपल्या प्रचारातून भगवान हनुमान यांचा धावा केला होता, परंतु कर्नाटकातील भाजपाच्या नेत्यांचा भ्रष्टाचार, धर्मद्वेष पाहता बजरंगबलीने काँग्रेसला घवघवती यश दिले आहे.
काय आहेत कारणे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 72.67 टक्के मतदारांनी मतदान केले. कर्नाटकातील मतदारांनी भाजपाला दूर सारत काँग्रेसच्या हातात सत्ता दिली. या राज्यातील सत्ता आपल्याकडे राहावी, यासाठी राजकीय पक्षांनी महिनाभर आपल्या पक्षाचा जोरदार प्रचार केला. भाजपाच्या कणखर प्रचार करत अनेक मुद्दे उपस्थित केले. त्यावर काँग्रेसने तंत्रशुद्ध पद्धतीने मुद्दे उपस्थित करत कर्नाटक राज्यातील लोकांचा विश्वास जिंकला. दरम्यान भाजप कर्नाटकात का पराभूत झाली याची कारणे समजून घेऊया.
भ्रष्टाचार आणि कमीशन : भाजपाने आपल्या उमेदवारांना जिंकवण्यासाठी पूर्ण कॅबिनेट कामाला लावली होती. प्रत्येक राज्यातील मोठं-मोठ्या नेत्यांना प्रचारासाठी बोलवले होते. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी अनेक रॅली आणि प्रचार सभा घेतल्या. परंतु कर्नाटकातील जनतेचे लक्ष मात्र भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचार आणि कमीशनच्या मुद्द्याकडेच होते. काँग्रेसने भ्रष्टाचाराचा मुद्दा लावून धरत भाजपावर आरोप केले. त्यावर भाजपाकडून काय उत्तर येणार याकडे जनता लक्ष देऊन होती.
कमीशन : भाजपच्या विरोधात काँग्रेसने 40 कमीशन सरकार हा मुद्दा लावून धरला. भाजपचे मंत्री एस. ईश्वरप्पा यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन राजीनामा द्यावा लागला होता. तर एकाला तुरुंगात देखील जावे लागले होते. भ्रष्टाचारासह काँग्रेसने भाजप नेत्यांच्या कमशीनचा मुद्दा उपस्थित केला होता. मठातून 30 टक्क्यांची लाच घेतल्याचा प्रचार देखील काँग्रेसने केला होता. शाळांच्या नावावरुन कशाप्रकारे भ्रष्टाचार केला जातो यावरुनही आरोप केला होता.
हिंदुत्वचा डाव फसला : निवडणुकीच्या प्रचारात भ्रष्टाचार आणि कमीशनचे मुद्दे अधिक जोर पकडत असल्याने भाजपाने प्रचाराला धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न केला. हिंदुत्त्वाचे कार्ड खेळले,पण हा डावही त्यांना जिंकवू शकला नाही. भाजपाने हलाला, हिजाब आणि अजानचे मुद्दे मांडत हिंदू-मुस्लीमचा मुद्दा या निवडणुकीत आणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. काँग्रेसने बजरंग दलावर बंदी घालण्याचे म्हणताच भाजपने याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु याचाही फायदा झाला नाही. या निवडणुकीत बजरंगबली कामात येत नसल्याचे दिसताच निवडणूक प्रचाराच्या अखेरीच्या दिवसात भाजपाने बजरंगबलीवरुन जनतेचे लक्ष दूर करण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हापर्यंत वेळ निघून गेली होती.
आरक्षणाचा डाव पडला उलटा : भारतीय जनता पक्ष आपली प्रतिमा सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणूक प्रचारात उतरवले. मोदी नावाच्या करिष्मेमुळे भाजप विजय मिळवेल असे कर्नाटका भाजपाला वाटले. परंतु त्याचाही काही उपयोग झाला नाही. दरम्यान, मुस्लीम आरक्षण संपवून लिंगायत आणि वोक्कालिंगा जातीला आपल्याकडे आकर्षित करण्याचा भाजपचा डाव विजय मिळवून देऊ शकला नाही.
हेही वाचा -