ETV Bharat / bharat

Karnataka Crime News : आयफोनसाठी केली डिलिव्हरी बॉयची हत्या, बाथरूममध्ये लपवून ठेवला मृतदेह! - पैसे नसल्याने डिलिव्हरी बॉयची हत्या

आयफोन विकत घेण्यासाठी पैसे नसल्याने डिलिव्हरी बॉयची हत्या केल्याची घटना कर्नाटकात घडली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीची अटक केली आहे.

youth killed courier boy for iPhone
आयफोनसाठी डिलिव्हरी बॉयची हत्या
author img

By

Published : Feb 20, 2023, 8:48 AM IST

हसन (कर्नाटक) : कर्नाटकच्या हसन जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील अरासेकेरे शहरात आयफोनसाठी एका 23 वर्षीय कुरिअर बॉयची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपीचे वय अवघे 20 वर्षे असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

असे आले प्रकरण उघडकीस : अरसेकेरे तालुक्याच्या कोपलू रेल्वे फाटकजवळ एका अज्ञात तरुणाचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम हाती घेतले होते. तो तरुण दुचाकीवर बॅग घेऊन जाताना पेट्रोल पंपातील सीसीटीव्हीत कैद झाला होता. पोलिसांनी याचा तपास केला असता हत्येचे गूढ उघड झाले. त्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली.

आयफोन डिलिव्हरीच्या वेळी हत्या : अरसेकेरे येथील आरोपी मुलाने एक सेकंड हँड आयफोन ऑनलाइन बुक केला होता. पोलिसांनी सांगितले की, 7 फेब्रुवारी रोजी कुरिअर बॉय आरोपीच्या घरी डिलिव्हरी करण्यासाठी गेला होता. यावेळी आरोपीने माझ्याकडे इतके पैसे नाहीत असे म्हणत आयफोनचा बॉक्स उघडण्यास सांगितले. मात्र डिलिव्हरी बॉयने पैसे दिल्याशिवाय बॉक्स उघडणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर आरोपीने त्याला घरात बोलावले आणि माझा मित्र पैसे घेऊन येत असल्याची माहिती दिली. त्याने डिलिव्हरी बॉयला थोडा वेळ बसण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने मागून येऊन त्याच्यावर चाकूने वार करून त्याचा निर्घृण खून केला.

मृतदेह चार दिवस बाथरूममध्ये ठेवला : पोलीस अधीक्षक हरिराम शंकर यांनी खुलासा केला की, खुनानंतर आरोपीने डिलिव्हरी बॉयचा मृतदेह गोणीत गुंडाळून चार दिवस घरातील बाथरूममध्ये ठेवला. यानंतर 11 फेब्रुवारीच्या रात्री तो मृतदेह दुचाकीवरून घेऊन गेला. अरसेकेरे शहरातील अंचेकोपलूजवळील रेल्वे ट्रॅकवर त्याने तो मृतदेह आणून जाळला. मात्र, आरोपी मृतदेह जाळण्यापूर्वी पेट्रोल स्टेशनवर पेट्रोल भरण्यासाठी गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. दुसरीकडे डिलिव्हरी बॉयच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती की तो ७ फेब्रुवारीपासून बेपत्ता होता.

अश्लील व्हिडियो कॉल करणाऱ्या डिलिव्हरी एजंटला अटक : मुंबईत महिलांना अश्लील व्हिडियो कॉल करणाऱ्या एका डिलिव्हरी एजंटला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने 30 हून अधिक महिलांसोबत हे कृत्य केल्याचे तपासात उघड झाले आहे. हा डिलिव्हरी एजंट फेसबुकवरील गृपमधून महिलांचे व्हॉट्सअ‍ॅप नंबर शोधायचा. आणि त्यानंतर तो त्यांना अश्लील व्हिडिओ कॉल करायचा. मालाड पोलिसांना याविषयी तक्रार प्राप्त झाल्यावर त्यांनी तपास करून आरोपीला अटक केली.

हेही वाचा : Mumbai Crime: 'तो' करायचा महिलांना अश्लील व्हिडिओ कॉल; व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवायचा प्रायव्हेट पार्टचे फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.