ETV Bharat / bharat

Karnataka Assembly Elections 2023: बेळगावात मतदारांच्या लांबच लांब रांगा, कोण जिंकणार?

कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 साठी आज मतदान होत आहे. कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्यात 5 कोटी 31 लाख 33 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मोठ्या प्रमाणात नागरिक सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी करत आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.

Karnataka Assembly Elections 2023
कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023
author img

By

Published : May 10, 2023, 12:49 PM IST

कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023

बेळगाव : कर्नाटकच्या 224 जागांसाठी आज प्रत्यक्ष मतदान पार पडत आहे. त्यासाठी एकूण 58,545 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. जोरदार प्रचार, गर्दी खेचणारे रोडशो, वादग्रस्त वक्तव्ये आणि अखेरच्या टप्प्यात बजरंगबलीच्या नावाने मत मागत आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाडत राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रचारानंतर आज प्रत्यक्ष मतदान पार पडत आहे. कर्नाटकमध्ये भाजप काँग्रेस आणि जेडीयुमध्ये थेट लढत होत आहे. यासाठी सकाळपासूनच नागरिक मतदान केंद्रावर आपला हक्क बजावण्यासाठी येत आहेत.

सकाळपासून लांबच लांब रांगा : राज्यात भाजप, काँग्रेस आणि जेडीयु यामध्ये थेट लढत होत आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भाग असलेल्या बेळगाव जिल्ह्यात मात्र भाजप काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये सुरस पहायला मिळत आहे. यासाठी बेळगावमधील सर्वच मतदान केंद्रावर सकाळी सात वाजल्यापासून मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर मतदानाचा हक्क प्रत्येकाला बजावता आला पाहिजे, यासाठी शासकीय सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे.

अनेक नेते मंडळी प्रचारात : कर्नाटक विधानसभा निवडणुकीमुळे गेले काही दिवस कर्नाटकचे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. प्रचारासाठी केंद्रासह राज्यातील अनेक नेते उतरले होते. भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सह राज्यातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते मंडळींनी कर्नाटकमध्ये रॅली आणि सभा घेत उमेदवारांचा प्रचार केला. तर काँग्रेसने देखील जोरदार ताकद लावली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक नेतेमंडळी काँग्रेसमध्ये तळ ठोकून होते. तर दुसऱ्या बाजूला सीमा भाग असलेल्या बेळगावमध्ये मात्र महाराष्ट्रामधून आलेल्या नेत्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या रोशाला सामोरे जावे लागले.

उमेदवारांचा जाहीर प्रचार : येथे महाराष्ट्र एकीकरण समितीला शिवसेना ठाकरे गटाचा जाहीर पाठिंबा होता. यासाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एकीकरण समितीच्या उमेदवारांचा जाहीर प्रचार केला. यामुळे या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. आज प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मतदार राजा आपला कौल कोणाला देणार. हे 13 मे रोजी मतमोजणी मधून स्पष्ट होणार आहे.

  1. हेही वाचा : Karnataka Assembly Elections 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023, काँग्रेसने जाहीर केला जाहीरनामा
  2. हेही वाचा : BJP List Karnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जारी केली उमेदवारांची पहिली यादी, 52 नव्या चेहऱ्यांना संधी
  3. हेही वाचा : Karnataka Assembly Elections 2023 : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर बंडखोर उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार, वाचा सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.