ETV Bharat / bharat

Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात भाजप-काँग्रेसचा बहुमताचा दावा, 'जेडीएस'ची राहील कळीची भूमिका - Karnataka Assembly election results update

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल १३ मे रोजी लागणार आहे. मतमोजणीची सर्व यंत्रणा तयार आहे. राज्यात भाजपला पुन्हा सत्तेवर येण्याचा विश्वास आहे. तर विरोधी काँग्रेसने आपणच विजयी होणार असा दावा केला आहे. त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली तर जेडीएसला भाव येणार अशा अटकळी आहेत. निकाल काही तासातच हाती येणार आहे. त्याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

Karnataka Assembly election results update

author img

By

Published : May 12, 2023, 7:40 PM IST

Updated : May 12, 2023, 10:46 PM IST

बंगळुरू : कर्नटकात विधानसभा निवडणुकीचा निकाल १३ मे रोजी लागणार आहे. राज्यात 224 जागांसाठी १० मे रोजी मतदान झाले आहे. कर्नाटक निवडणूक आखाड्यात एकूण ५०५३ उमेदवारी अर्ज आले होते. मात्र ५०२ अर्ज बाद ठरले आणि ३९५३ अर्ज स्वीकारण्यात आले. त्याचबरोबर ५६३ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले होते. त्यामुळे 2615 उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. त्यामध्ये 2429 पुरुष उमेदवार, 185 महिला उमेदवार, 1 ट्रान्सजेंडर, 918 अपक्ष उमेदवार आहेत. या सगळ्यांच्या भवितव्याचा फैसला काही तासावर होणार आहे.

कर्नाटकातील मतदारांचा आढावा : कर्नाटकात सगळे मिळून 5,21,76,579 मतदार आहेत. यामध्ये 2,62,42,561 पुरुष मतदार असून 2,59,26,319 महिला मतदार आहेत. तर 4839 इतर मतदार आहेत. 5,55,073 मतिमंद मतदार, 80 वर्षांवरील 12,15,763 आणि 100 वर्षांवरील 16,976 मतदार आहेत. तसेच 9,17,241 मतदारांची पहिल्यांदा मतदानासाठी नोंदणी झाली आहे. राज्यात मतदानाच्या दिवशी 73.19 टक्के मतदान झाले आहे. या मतदारांनी कुणाला कौल दिला आहे ते १३ तारखेला संध्याकाळपर्यंत समजेल.

कर्नाटकात सत्ता स्थापनेसाठी 113 ची मॅजिक फिगर : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचे गणित पाहता विधानसभेत सरकार स्थापन करण्यासाठी किमान 113 जागांची आवश्यकता आहे. त्यापैकी अनुसूचित जाती (SC) साठी 36 जागा आणि अनुसूचित जमाती (ST) साठी 15 जागा राखीव आहेत. विद्यमान विधानसभेत भारतीय जनता पक्षाचे बहुमताचे सरकार आहे. गेल्यावेळी आणि पोटनिवडणुकीचे निकाल पाहता काँग्रेसकडे 75 आणि जेडीएसकडे 28 जागा आहेत. आता निकालाकडे सर्वांचे लक्ष असून पुन्हा भारतीय जनता पक्ष सत्तेवर येणार का हा कळीचा प्रश्न आहे. कारण निवडणूक झाल्यानंतर बहुतांश एक्झिट पोलमध्ये कर्नाटकमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यात किती तथ्य आहे, तेही निकाल लागल्यानंतर स्पष्ट होईल.

भाजप, काँग्रेसचे विजयाचे दावे - निकाल काही तासांतच लागणार आहे. त्याचवेळी राज्यातील सत्ता स्थापनेसाठी प्रबळ दावेदार मानण्यात आलेल्या दोन्ही पक्षांनी आपणच विजयी होणार असे दावे केले आहेत. सत्ताधारी भाजपचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सगळेच एक्झिट पोल धुडकावून लावले आहेत. राज्यात भाजपच पुन्हा सत्तेवर येईल असा दावा बोम्मई यांनी केला आहे. तसे केंद्रातील भाजप नेत्यांना आपण कळवल्याचेही मोम्मई यांनी आज स्पष्ट केले. तसेच पुढील सरकार स्थापनेबाबत ज्येष्ठ नेते येडियुरप्पा यांच्याशी चर्चा केल्याची माहितीही बोम्मई यांनी दिली. दुसरीकडे काँग्रेस नेते डी के शिवकुमार यांनीही कर्नाटकात काँग्रेस सरकार स्थापन करेल असा दावा केला आहे. आपल्या पक्षाला पूर्ण बहूमत मिळेल असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे. प्रचारात काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी तसेच सोनिया गांधी यांनी भाग घेऊन काँग्रेसला बळ दिल्याचे शिवकुमार यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे विद्यामान अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे हे कर्नाटकातीलच आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठीसुद्धा ही विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची आहे.

जेडीएसची भूमिका कळीची - कर्नाटकचा निकाल जर एक्झिट पोलनुसार लागला तर राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल. त्यावेळी कर्नाटकातील माजी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री देवेगौडा तसेच कुमारस्वामी यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यांचे सरकार स्थापनेतील वजन त्यामुळे वाढणार असे दिसत आहे. आता नेमका कौल मतदारांनी कुणाला दिला आहे. त्यावरच सगळा राजकारणाचा खेळ रंगेल. त्यासााठी १३ तारखेला संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल. निकालाची उत्सुकता मात्र सगळ्यांनाच आहे. महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्र एकिकरण समितीने बेळगावमध्ये उभे केलेले उमेदवार किती यश मिळवतात ते पाहावे लागेल. जर बेळगावमध्ये एमईएसचे उमेदवार निवडून आले तर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला तो मोठा धक्का असेल. मात्र नेमके काय घडते यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.

  1. Karnataka Elections Results : कर्नाटक निवडणूक निकालावर मोठी भविष्यवाणी, वाचा कोण करणार सरकार स्थापन
  2. Karnataka CM on government formation : कर्नाटकात भाजपचेच सरकार येणार, मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंना विश्वास
  3. Karnataka Election 2023 : कर्नाटक निवडणुकीपूर्वी 'या' नेत्यांनी केली होती बंडखोरी, उद्या होईल फैसला

Last Updated : May 12, 2023, 10:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.