ETV Bharat / bharat

BJP Manifesto For Karnataka : 'सत्तेत आल्यास राज्यात समान नागरी कायदा लागू करू', भाजपचे कर्नाटक निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आश्वासन

author img

By

Published : May 1, 2023, 8:22 PM IST

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 साठी संकल्प पत्र जारी केले. यामध्ये राज्यात सरकार स्थापन झाल्यास समान नागरी संहिता लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

BJP Manifesto For Karnataka
कर्नाटकसाठी भाजपचा जाहीरनामा

बेंगळुरू : भाजपने आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी व्हिजन डॉक्युमेंट (संकल्प पत्र) जारी केले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर म्हटले की, 'कर्नाटकचा जाहीरनामा वातानुकूलित खोलीत बसून बनवण्यात आलेला नाही, तर यासाठी कार्यकर्त्यांनी बरीच मेहनत घेतली आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, केंद्रीय खाण, कोळसा आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, कर्नाटक भाजपचे अध्यक्ष नलिंकुमार कटील आदी उपस्थित होते.

भाजपने संकल्प पत्रामध्ये केलेल्या घोषणा : संकल्प पत्रामध्ये कर्नाटकात उच्चस्तरीय समितीने केलेल्या शिफारशींवर आधारित समान नागरी संहिता (UCC) लागू करण्यात आली आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात अटल आहार केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना तीन सिलिंडर मोफत देण्यात येणार असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना अर्धा लिटर नंदिनी दूध, पाच किलो तांदूळ आणि पाच किलो भरड धान्य देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. गरजू लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर व्याज सवलत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी मदतीचे पॅकेजही जाहीर करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना बियाणांसाठी 10 हजार रुपये देऊ करण्यात आले आहेत. यासोबतच कर्नाटक अपार्टमेंट ओनरशिप अ‍ॅक्ट, 1972 मध्ये सुधारणांचा समावेश करण्यात आला आहे. बेंगळुरूमधील अपार्टमेंट रहिवाशांना सुविधा देण्यासाठी कर्नाटक रहिवासी कल्याण सल्लागार समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. यासोबतच उगादी, गणेश चतुर्थी आणि दिवाळीदरम्यान बीपीएल कार्डधारकांना मोफत एलपीजी सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले गेले आहे. पक्षाने शहरी भागात 5 लाख आणि ग्रामीण भागात 10 लाख घरे बांधण्याची घोषणा केली आहे.

मोदींची कॉंग्रेसवर टीका : यापूर्वी राज्यात झालेल्या निवडणुकीत पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात समाजातील प्रत्येक घटकाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर गोरक्षणाच्या उपाययोजनांकडेही लक्ष देण्यात आले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कोलार येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना आपली आणि सापाची तुलना केल्याबद्दल काँग्रेसवर सडकून टीका केली. आगामी विधानसभा निवडणुकीत येथील जनता त्यांना चोख प्रत्युत्तर देईल, असे पंतप्रधान म्हणाले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी कर्नाटकातील कलबुर्गी येथे एका सभेत म्हटले होते की, 'पीएम मोदी हे 'विषारी सापा'सारखे आहेत.

'जनता 10 मे रोजी उत्तर देईल' : काँग्रेसच्या या टिप्पणीवर पीएम मोदी म्हणाले की, भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत काँग्रेसला सर्वात जास्त त्रास होतो. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'देशातील जनता माझ्यासाठी भगवान शिवाच्या रूपात आहे. देवाच्या रूपात जनतेच्या गळ्यातला साप असणं मला मान्य आहे. तुम्हाला कर्नाटकातील जनता 10 मे रोजी चोख प्रत्युत्तर देईल'. काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करताना पंतप्रधान मोदींनी पक्षाला 'जुने इंजिन' असे संबोधले. 'काँग्रेस हे 'जुने इंजिन' आहे. त्यामुळे विकास थांबला आहे. काँग्रेस पक्ष जनतेला दिलेली आश्वासने कधीच पूर्ण करत नाही. 'इम्परफेक्ट गॅरंटी' हा त्यांचा विक्रम आहे. काँग्रेसने जनतेची फसवणूक केली आहे, मात्र भाजपने विकासाची अनेक कामे करून सर्व आश्वासनांची पूर्तता केली आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.

हेही वाचा : Case Against Bageshwar Dham : देवाचा अवतार सांगून फसवणूक केल्याचा आरोप; बागेश्वर बाबाविरोधात गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.