नवी दिल्ली- चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांनी कारगिल जिल्ह्यातील द्रास भागात प्रत्यक्ष ताबारेषेनजीकच्या भागात भेट दिली. कारगिल विजय दिवस साजरा होण्यापूर्वी एक दिवस त्यांनी सीमारेषेनजीकची सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच सुसज्जतेची माहिती जाणून घेतली.
सोमवारी देशभरात २२ वा कारगिल विजय साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे द्रासला भेट देणार आहेत. सर्वोच्च त्याग आणि शौर्य दाखविणाऱ्या शहीद जवानांना कारगिल युद्ध स्मारक येथे अभिवादन करणार आहेत.
हेही वाचा-कारगिल युद्धातील परमवीर चक्र प्राप्त शूर सैनिकांची थरारक कहाणी
२०१९ मध्ये खराब हवामानामुळे राष्ट्रपतींना द्रासमधील कारगिल विजय दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणे शक्य झाले नव्हते. त्याऐवजी राष्ट्रपतींनी श्रीनगरमधील बदमीबाग येथील आर्मी १५ मुख्यालयात असलेल्या युद्ध स्मारकाजवळ शहीद जवानांना अभिवादन केले होते.
हेही वाचा-पूर परिस्थितीमुळे राज्यात 149 जणांचा मृत्यू, तर 64 जण अद्यापही बेपत्ता
भारतीय सैन्यदलाच्या ट्विटरवरील माहितीनुसार सीडीएस जनरल बिपिन रावत यांनी द्रास भागातील प्रत्यक्ष ताबारेषेजवळ भेट दिली आहे. सीडीएस रावत यांनी सैनिकांच्या तुकडीशी चर्चा केली. त्यांचे उच्च मनोधैर्याचे सीडीएस रावत यांनी कौतुक केले. दृढ आणि स्थिर राहण्यावर भर देण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
हेही वाचा-KARGIL VIJAY DIWAS पाकिस्तानी घुसखोरीचा भारताने असा केला होता पर्दाफाश