ETV Bharat / bharat

KARGIL VIJAY DIWAS : बॉम्ब हल्ल्यात पाय तुटला, रक्ताची लागली धार, तरीही जिवाची पर्वा न करता 8 शत्रू टिपले

author img

By

Published : Jul 26, 2021, 2:35 PM IST

Updated : Jul 26, 2021, 2:48 PM IST

'आई, तू माझी काळजी करू नकोस. मी मजेत आहे आई-वडिलांची काळजी घ्या', असे पत्र जवानाने लिहले. मात्र, हे पत्र गावात पोहोचण्यापूर्वीच जवानाचे पार्थिक गावात पोहोचले. कारगिलच्या लढाईत बॉम्बने पाय तुटला. तरीही तो शत्रूंशी लढत राहिला आणि पाकिस्तानच्या 8 जणांचा खात्मा केला. ही वीरगाथा आहे राजस्थानच्या जोधपूरमधील खेडी चरणान गावातील शहीद जवान काळूराम जाखड यांची.

kaluram
kaluram

जोधपूर - आज कारगिल युद्धाला 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने आज भारतभर कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. कारगिल प्रदेशात पाकिस्तानने घुसखोरी केल्याचा कळस म्हणून हे युद्ध झाले. या युद्धामध्ये भारताच्या शेकडो सैनिकांनी आपले बलिदान देऊन देशाच्या सीमांचे रक्षण केले. कारगिल परिसराच्या दुर्गम टेकड्यांमध्ये अशी अनेक ठिकाणे होती जी पाकिस्तानी घुसखोर आणि पाक सैन्याने ताब्यात घेतली होती. मात्र, शत्रूंपासून त्यांची सुटका करण्यासाठी भारताला आपले अनेक शूर सैनिक गमवावे लागले आहेत.

शहीद जवान काळूराम जाखडची वीरगाथा

वीर जवान काळूराम जाखडची वीरगाथा

जोधपूरच्या भोपाळगड भागातील खेडी चरणान गावात राहणारा गंगाराम जाखड यांचा मुलगा काळूराम जाखड हे 28 एप्रिल 1994 रोजी भारतीय सैन्याच्या 17 जाट रेजिमेंटमध्ये सैनिक म्हणून दाखल झाले. साडेचार वर्षानंतर ते जम्मू-काश्मीर भागात तैनात झाले होते. कारगिल युद्ध मे 1999 मध्ये सुरू झाले. काळूराम कारगिलच्या टेकड्यांवर सुमारे 17850 फूट उंचीवर पीपल-टू-तारा सेक्टरमध्ये आपल्या रेजिमेंटसोबत तैनात होते.

वीर जवान काळूराम जाखडचे शेवटचे पत्र
वीर जवान काळूराम जाखडचे शेवटचे पत्र

पाय तुटूनही लढले, 8 शत्रूंना ठार केले

यादरम्यान, 4 जुलै 1999 रोजी पाकिस्तानी सैन्याने काळूराम यांच्या रेजिमेंटवर हल्ला केला. यात बॉम्बच्या स्फोटामुळे काळूराम यांचा पाय शरीरापासून वेगळा झाला. असे असूनही काळूराम यांनी शत्रूंशी लढाई सुरूच ठेवली आणि रॉकेट लाँचरने शत्रूच्या एका बंकरचा नाश केला. त्यात लपलेल्या 8 घुसखोरांना ठार केले.

वीर जवान काळूराम जाखडचे शेवटचे पत्र
वीर जवान काळूराम जाखडचे शेवटचे पत्र

पिंपळ टॉप हे पाक सैन्याने आणि घुसखोरांनी पकडले होते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 17 जाट बटालियनची तुकडी पाठविली गेली, त्यात जोधपूरच्या खेडी चरणाचे नाईक काळूराम जाखडही होते. यासाठी 4 जुलै रोजी भीषण लढाई झाली. काळूरामवर मोर्टारची जबाबदारी होती. ज्यावरून त्यांनी शत्रूंना धुळ चारली. यात काळूराम यांनी पिंपळ टेकडीवरील पाकिस्तानचे 2 बंकर नष्ट केले आणि बर्‍याच पाक सैनिकांनाही ठार केले.

पिंपळ पॉईंट जिंकला अन्...

एक बंकर शिल्लक राहिला होता, त्याला घेरले गेले. यानंतर विचारविनिमयानंतर सर्वतोपरी हल्ला करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या दिशेने गोळे फेकण्यास सुरुवात केली. त्यामुळे बंकरमध्ये लपून बसलेले पाकिस्तानी सैनिक फारच चिढले. त्यांनीही भारतीयांकडे गोळे फेकायला सुरूवात केली. याला काळूराम आणि त्यांच्या साथीदारांकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. दरम्यान, शत्रूचा गोळा आला आणि काळूरामच्या मांडीवर जोरात आदळला. तरीही काळूराम यांनी धीर सोडला नाही. ते हल्ला करतच राहिले. अखेर शिल्लक राहिलेले सर्व बंकर नष्ट झाल्यानंतर भारतीय सैन्याने पिंपळ पॉईंट जिंकला. परंतु यावेळी काळूराम जाखड यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले.

शहीद काळूरामचे स्मारक
शहीद काळूरामचे स्मारक

वीर जवान काळूरामचा सन्मान

भारत सरकारने काळूराम यांचा धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि देशभक्ती यासाठी मरणोपरांत सन्मान केला. शहीद काळूराम जाखाड यांच्या स्मरणार्थ गावातून जोधपूरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर शहीद स्मारक उभारण्यात आले आहे. तसेच, गावाच्या मुख्य चौकात मूर्ती स्थळ बनवण्यात आले आहे. शिवाय त्यांच्या नावावरून शाळेचेही नामकरण करण्यात आले आहे.

खेडी चरणान या गावातले रहिवासी सुनील बिश्नोई सांगतात, की 'काळूराम जाखड यांच्या प्रेरणेने गावातील बरेच तरुण सैन्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या नावावर स्मारक बांधले आहे. परंतु आमची मागणी आहे की जर तो चांगला खेळाडू असेल तर त्याच्या नावावर एक क्रीडांगण तयार केले पाहिजे. त्यांच्या स्मारकासाठी शासनाने वीज कनेक्शन व एक पाण्याचा पंप बसवावा'.

शहीद होण्यापूर्वी आईला ह्रदयस्पर्शी पत्र

1 जानेवारी 1999 रोजी रजा संपल्यानंतर काळूराम कर्तव्यावर परत गेले होते. त्याच दिवशी त्यांनी आईला पत्र लिहिले. यानंतर, संभाषण केवळ पत्रव्यवहाराद्वारेच चालू होते. त्यांची आई अलोन देवी सांगतात, की 'मी नेहमीच असेच म्हणायचे की मी काहीतरी नवीन करेन आणि त्याला नाव देईन. त्याने ते केले आहे'. 4 जुलै रोजीच काळूराम यांनी कुटुंबासाठी एक पत्र लिहून पोस्ट केले होते. त्या रात्रीच त्याच्या भावाला खबर मिळाली की तो शहीद झाला आहे. 10 जुलै रोजी काळूराम यांचे पत्र गावात पोहोचले. मात्र, त्याआधी शहीद काळूराम यांचे पार्थिव गावात पोहोचले.

4 जुलै रोजी काळूराम यांनी रणांगणावरुन एक पत्र लिहिले होते. त्यानंतर ते लढाईला गेले होते. त्या पत्रात असेही लिहिले होते, की 'मी मजेत आहे. माझ्याबद्दल चिंता करू नका. आई आणि वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या'. हे पत्र त्याने त्याच्या भावाला लिहिले. या पत्रात कुटुंबातील जवळजवळ प्रत्येक व्यक्तीचे नाव लिहिले. शिवाय गावातील त्याच्या अनेक मित्रांची नावेही लिहिलेली.

हेही वाचा - सैन्यामुळेच आम्ही रात्री शांत झोपतो, कारगिल नायकाच्या वडिलांचा 'सर्वात कठीण युद्धा'च्या विजयाच्या आठवणींना उजाळा

Last Updated : Jul 26, 2021, 2:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.