कानपूर (उत्तर प्रदेश) Kanpur Mahindra Car Accident Case: सीट बेल्ट घातल्यानंतरही अपघातादरम्यान स्कॉर्पिओ कारची एअरबॅग उघडली नाही. यामुळे एका व्यक्तीच्या एकुलत्या एक मुलाला जीव गमवावा लागला. हा अपघात 14 जानेवारी 2021 रोजी झाला होता. आपल्या मुलाच्या मृत्यूसाठी एअरबॅगला जबाबदार धरून जुही, कानपूर येथील रहिवासी राजेश मिश्रा यांनी या प्रकरणातील न्यायालयाच्या आदेशानुसार आनंद महिंद्रा यांच्यासह 13 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
डिव्हायडरला धडकल्याने कार उलटली: 2 डिसेंबर 2020 रोजी राजेश मिश्रा यांनी शहरातील जरीब चौकी येथील तिरुपती शोरूममधून त्यांचा एकुलता एक मुलगा डॉ. अपूर्व याला स्कॉर्पिओ कार दिली होती. या कारची किंमत 17 लाख रुपये होती. ही कार त्यांनी आपल्या मुलाला भेट म्हणून दिली होती. कार खरेदी केल्यानंतर 14 जानेवारी 2021 रोजी डॉ. अपूर्व आपल्या दोन मित्रांसह लखनौहून कानपूरला येत होते. यावेळी कार वाटेत दुभाजकावर आदळली. यानंतर ती अनेकवेळा रस्त्यावर पलटली. यावेळी डॉ. अपूर्वसह सर्वांनी सीट बेल्ट घातला होता.
तक्रारीवरून अधिकाऱ्यांनी गैरवर्तन : अपघातात अपूर्वचा जागीच मृत्यू झाला. वडील राजेश मिश्रा यांनी पोलिसांच्या मदतीने कारची स्थिती तपासली असता एअरबॅग न उघडल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचं दिसून आले. यानंतर त्यांनी सर्वप्रथम महिंद्रा ग्रुपच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी मदत करण्याऐवजी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. यानंतर राजेश मिश्रा यांनी न्यायालयाचा आधार घेतला. न्यायालयाच्या आदेशानुसार रायपुरवा पोलीस ठाण्यात महिंद्रा ग्रुपच्या १३ अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. दरम्यान, याबाबत कंपनीकडून अद्याप अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.
रायपुरवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल: रायपुरवा पोलीस ठाण्याचे प्रभारी अमन सिंग यांनी गुन्हा दाखल झाल्याची पुष्टी केली. जुहीचे रहिवासी राजेश मिश्रा यांच्या तक्रारीवरून आणि न्यायालयाच्या आदेशानुसार, महिंद्रा समूहाच्या (अनेक संचालकांसह) 13 जबाबदार अधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यात चंद्रप्रकाश गुरनानी, विक्रम सिंग मेहता, राजेश गणेश जेजुरीकर, अनीस दिलीप शाह, थोताला नारायणस्वामी, हरग्रेव खेतान, मुथय्या मुरगप्पन मुथय्या, विशाखा नीरूभाई देसाई, निस्बाह गोदरेज, आनंद गोपाल शर्मा, विजय कुमार महिंद्रा, आनंद सिख शर्मा आणि तिरुपती ऑटोचे व्यवस्थापक (अधिकृत डीलर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी प्रायव्हेट लिमिटेड) यांचा समावेश आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या प्रवक्त्यानं दिलं स्पष्टीकरण- या प्रकरणाबाबत महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या प्रवक्त्यानं स्पष्टीकरण दिलं आहे. प्रवक्त्यानं केलेल्या खुलाशानुसार 23 सप्टेंबर 2023 रोजी दाखल केलेल्या एफआयआरचे प्रकरण 18 महिन्यांहून जुने आहे. ही घटना जानेवारी 2022 मध्ये घडली होती. वाहनात एअरबॅग नसल्याचा आरोप करण्यात आला. प्रत्यक्षात 2020 मध्ये निर्मित Scorpio S9 प्रकारात एअरबॅग्सचा समावेश होता. ऑक्टोबर 2022 मध्ये टीमनं केलेल्या तपासानुसार एअरबॅगमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड आढळला नाही. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून आवश्यक असलेल्या कोणत्याही पुढील तपासासाठी अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यास कंपनी वचनबद्ध आहे. आम्ही कुटुंबाप्रती पूर्णपणे सहानुभूती व्यक्त करत असल्याचंही कंपनीच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे.
हेही वाचा:
- AIADMK Exits NDA : तामिळनाडूमध्ये एनडीएला झटका, AIADMK ने संबंध तोडले, भाजपा प्रदेशाध्यक्षांना धरले जबाबदार
- Rahul Gandhi Accused PM Modi : बिलासपूरमध्ये राहुल गांधींनी काढले ओबीसी कार्ड, मोदींवर ओबीसी वर्गाची फसवणूक केल्याचा आरोप
- SC Dismissed V K Singh Plea: जनरल व्ही के सिंह यांची 'ती' मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली