बंगळुरू : प्रसिद्ध अभिनेते डॉ. शिवराजकुमार यांच्या पत्नी गीता शिवराजकुमार यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गीता शिवराजकुमार यांनी कर्नाटक कॉंग्रेसच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांचे भाऊ व सोराबा मतदारसंघाचे उमेदवार मधु बंगारप्पा देखील उपस्थित होते. गीता शिवराजकुमार या कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. बंगारप्पा यांच्या कन्या आहेत.
2014 मध्ये जेडीएसच्या तिकिटावरून निवडणूक लढवली : गीता आधीच सोराबा विधानसभा मतदारसंघात मधु बंगारप्पा यांच्यासाठी प्रचार करत आहेत. सोराबा येथे त्यांचे मोठे बंधू कुमार बंगारप्पा हे भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार आहेत. मधू बंगारप्पा यांनी सुमारे एक वर्षापूर्वी जेडीएस सोडले आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. गीता शिवराजकुमार यांनी 2014 मध्ये जेडीएसच्या तिकिटावरून भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
'कॉंग्रेसमध्ये सामिल होण्याचा आनंद' : यावेळी बोलताना गीता शिवराजकुमार म्हणाल्या, 'माझा भाऊ जिथे असेल तिथे मीही असेल. उद्यापासून आम्ही प्रचार करणार आहोत. कॉंग्रेससारख्या ऐतिहासिक पक्षात सामील होण्याचा आनंद आहे. शिवराजकुमार सोराबा येथे प्रचार करणार आहेत. सध्या ते चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. त्या म्हणाले की मी प्रचारासाठी येणार आहे.' यावेळी बोलताना डीके शिवकुमार म्हणाले, 'मधु बंगारप्पा यांच्यानंतर आता त्यांची बहीण गीता शिवरकुमार यांना पक्षात आणण्यात आम्हाला यश आले आहे. काल उडुपीमध्ये राहुल गांधी यांनी राज्यातील सर्व मुलींना मोफत बस प्रवासाची घोषणा केली होती. कोणत्याही मुलीने बसचे भाडे भरणार नाही. आता गीता काँग्रेसमध्ये सामील झाली आहे,' असे ते म्हणाले.
आमदार यत्नाल यांच्या माफीची मागणी : अभिनेता सुदीपच्या भाजप प्रचारावर भाष्य करताना शिवकुमार म्हणाले, 'अभिनेता सुदीप आणि माझ्यातील संभाषणावर बोलण्याची गरज नाही. अभिनेता दर्शन आणि सुदीप दोघेही माझे मित्र आहे. डीके शिवकुमार हे माझे चांगले मित्र असल्याचे सुदीपने आधीच सांगितले आहे. सुदीप आणि दर्शन पक्षाशी संबंधित नाहीत. ते मैत्रीखातीर प्रचार करत आहेत. ते काँग्रेस उमेदवाराचा देखील प्रचार करणार आहेत. शिवकुमार यांनी भाजप आमदार बसनागौडा यत्नाल यांच्या सोनिया गांधींबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत यत्नाल यांना भाजपमधून बडतर्फ करण्याची मागणी केली. 'काँग्रेस कोणत्याही कारणास्तव हे सहन करणार नाही. या प्रकरणी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनीही माफी मागावी,' अशी मागणी त्यांनी केली आहे.