लखनऊ - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे माजी राज्यपाल कल्याण सिंह यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे.
काय म्हणाले राष्ट्रपती?
'कल्याण सिंह यांचा जनतेशी एक अद्भूत संबंध होता. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वच्छ राजकारणाचे जोरदार समर्थन केले. त्यांनी गुन्हेगार आणि भ्रष्ट लोकांना शासन व्यवस्थेतून बाहेर काढले. त्यांनी पदांची प्रतिष्ठा वाढवली. त्यांच्या मृत्यूमुळे झालेले नुकसान भरून न येणारे आहे. माझी मनापासून शोकसंवेदना!', असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे माजी राज्यपाल कल्याण सिंह यांचे नुकतेच निधन झाले. त्याला श्वसनाचा त्रास होता. त्यांच्यावर राजधानीच्या संजय गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये (एसजीपीजीआय) उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
पार्थिव निवास्थानी पोहोचले
कल्याण सिंह यांचे पार्थिक लखनऊ येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कल्याण सिंह यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला जाणार आहे.
23 ऑगस्टला होणार अंत्यसंस्कार
कल्याण सिंह यांचे पार्थिव आज (22 ऑगस्ट) सकाळी 11:00 ते 1:00 या दरम्यान विधानसभेत आणि 1:00 ते 3:00 पर्यंत भाजप प्रदेश पार्टी कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पार्थिव एअर अॅम्ब्युलन्सद्वारे अलीगढला नेले जाईल. अंतिम संस्कार 23 ऑगस्ट रोजी केले जाणार आहेत.