नवी दिल्ली- काँग्रेस नेते राहुल गांधींवर टीका करताना कलावती या महिलेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अडचणीत सापडण्याची शक्यता आहेत. बुधवारी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान २००८ मध्ये विदर्भातील कलावती बांदूरकर या विधवा महिलेच्या घरी राहुल गांधींनी भेट दिल्याचा शाह यांनी संदर्भ दिला होता. त्यानंतर कलावती यांनी खुलासा दिल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सादर केलेल्या त्यांच्या हक्कभंगाच्या प्रस्तावात खासदार मणिक टागोर म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी केलेल्या संसदेच्या विशेषाधिकाराचे उल्लंघन केले आहे. याकडे तुमचे लक्ष वेधण्यासाठी हे पत्र लिहिले आहे. लोकसभेच्या नियमानुसार सभागृहाला संबोधित करताना अचूक आणि सत्य माहिती देणे हे मंत्र्यांचे कर्तव्य आहे. लोकसभेत 8 ऑगस्टला अमित शाह यांनी विधवा शेतकरी महिला कलावती यांच्याबाबत चुकीची माहिती दिली. कलावतींना मोदी सरकारने सुविधा दिल्याची माहिती दिली. स्वत: कलावती यांनी सरकारची मदत मिळाली नसल्याचे माध्यमांमध्ये स्पष्ट केले.
-
'मोदी सरकार झूठ बोल रही है'
— Congress (@INCIndia) August 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
कल संसद में गृहमंत्री अमित शाह ने यवतमाल की कलावती जी से जुड़े झूठे दावे किए थे।
कलावती जी खुद ही उन झूठे दावों की हकीकत बता रही हैं।
सुनिए, कैसे जननायक राहुल गांधी जी से मिलने के बाद उनके जीवन में बदलाव आया 👇🏼 pic.twitter.com/SpKKrR1vSK
">'मोदी सरकार झूठ बोल रही है'
— Congress (@INCIndia) August 10, 2023
कल संसद में गृहमंत्री अमित शाह ने यवतमाल की कलावती जी से जुड़े झूठे दावे किए थे।
कलावती जी खुद ही उन झूठे दावों की हकीकत बता रही हैं।
सुनिए, कैसे जननायक राहुल गांधी जी से मिलने के बाद उनके जीवन में बदलाव आया 👇🏼 pic.twitter.com/SpKKrR1vSK'मोदी सरकार झूठ बोल रही है'
— Congress (@INCIndia) August 10, 2023
कल संसद में गृहमंत्री अमित शाह ने यवतमाल की कलावती जी से जुड़े झूठे दावे किए थे।
कलावती जी खुद ही उन झूठे दावों की हकीकत बता रही हैं।
सुनिए, कैसे जननायक राहुल गांधी जी से मिलने के बाद उनके जीवन में बदलाव आया 👇🏼 pic.twitter.com/SpKKrR1vSK
लोकसभेत सादर झालेल्या माहितीच्या सत्यतेबाबत शंका- राहुल गांधी यांनी घर बांधण्यासाठी मदत केल्याचे कलावतींनी म्हटले आहे. मात्र, गेल्या आठ वर्षांपासून मोदी सरकारने कोणतीही सुविधा दिली नसल्याचे सांगितले आहे. केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी केलेले विधान आणि पीडित कलावती यांनी सांगितलेली वस्तुस्थिती यामुळे लोकसभेत सादर झालेल्या माहितीच्या सत्यतेबाबत शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे विशेषाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे खासदार टागोर यांनी पत्रात नमदू केले आहे. कलावतींबाबत दिलेल्या चुकीच्या माहितीची दखल घेऊन कारवाई करण्यात यावी. त्यासाठी तुम्ही अधिकाराचा वापर करावा, असे तामिळनाडूमधील विरुधुनगरचे लोकसभा खासदार टागोर यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते अमित शाह? पंतप्रधान मोदी यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावर बोलताना अमित शाह यांनी राहुल गांधींची खिल्ली उडविली होती. अमित शाह राहुल गांधी यांनी कलावती या महिलेल्या घरी भेट देऊन जेवण केले. त्यानंतर गरिबीसह अडचणींबाबत चर्चा केली. त्यानंतर सहा वर्षे सरकार सत्तेत असताना काय केले? मोदी सरकारने कलावती यांना घर, वीज, गॅस कनेक्शन, रेशन आणि शौचालय दिल्याचा दावा शाह यांनी केला. राहुल गांधी यांचे राजकीय लाँचिंग १३ वेळा करण्यात आले. मात्र, १३ वेळा हे प्रयत्न अयशस्वी झाल्याचे शाह यांनी म्हटले.
कलावतींनी काय केला आहे खुलासा? मदत केल्याचे अमित शाह यांनी खोटे सांगितल्याचा दावा यवतमाळ जिल्ह्यातील जवळका येथील कलावती बांदूरकर यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्यामुळेच घर, वीज अशी सर्व मदत मला मिळाली. मोदी निवडून आल्यापासून काहीच आर्थिक मदत मिळाली नाही. त्यामुळे अमित शाह हे खोटे बोलतात, असा दावा कलावती यांनी केला आहे.
हेही वाचा-