गांधीनगर- राम नवमीच्या सणाच्या दिवशी, काजल हिंदुस्थानीने गीर सोमनाथ जिल्ह्यातील उना येथे एका धर्मसभेत द्वेषपूर्ण भाषण केले होते. यानंतर उना शहरात तणाव निर्माण झाला होता. उना पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर तिला उना न्यायालयात हजर करण्यात आले. तिचा जामिन मंजूर झाला नाही. त्यानंतर न्यायालयाने तिला जुनागड कारागृहात सोपवण्याचे आदेश देण्यात आले.
रामनवमीच्या दिवशी, काजल हिंदुस्थानीने जातीय तेढ पसरवण्यासाठी एका समुदायाला लक्ष्य केले. या चिथावणीखोर भाषणाविरोधात संपूर्ण उना शहरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. गेल्या काही दिवसांमध्ये काही समुदायांमध्ये किरकोळ मारामारी झाल्याच्या घटनाही समोर घडल्या होत्या. द्वेष भडकवणारे भाषण दिल्याप्रकरणी उना पोलिसांनी स्वत: काजल हिंदुस्थानीविरुद्ध उना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
८०हून अधिक लोक पोलिसांच्या ताब्यात काजल हिंदुस्थानीला तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिल्यानंतर गीर सोमनाथ पोलिसांनी कडक पोलिस बंदोबस्तात तिला जुनागड तुरुंगात पाठवले. तिथेही कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी दोन्ही समुदायातील ८०हून अधिक लोकांना ताब्यात घेतले. काही आरोपींना जामीन मिळाला आहे. त्यामुळे काही लोक अजूनही पोलिसांच्या ताब्यात असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी म्हणून काजल हिंदुस्थानी हिला अटक केली होती. विशिष्ट समुदायातील महिलांवर अन्याय होत असल्याचे ती भाषणामधून सांगत असते. तसेच विशिष्ट समुदायातील महिलांनी हिंदु पुरुषांशी लग्न केल्याने होणारे ती फायदेदेखील सांगत असते.
कोण आहे काजल हिंदुस्थानी? काजल हिंदुस्तानीचे खरे नाव काजल सिंहला आहे. ती मुळची गुजरातमधील जामनगरमधील रहिवाशी आहे. ट्विटरवर तिने प्रोफालईमध्ये स्वत:ची ओळख उद्योजक, संशोधक, विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ती व राष्ट्रवादी अशी दिलेली आहे. ट्विटरवर तिला ९२ हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी अनुसरण केलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही तिला फॉलो करतात. तिने अनेकदा विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला दिसून आला आहे. तिने राजस्थानमध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप नेते ओमप्रकाश बिर्ला यांचा प्रचार केला होता.