ETV Bharat / bharat

काबुल विमानतळावरील बॉम्बस्फोटातून दिसले अमेरिकेसह तालिबानच्या सुरक्षा दलाचे अपयश - काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बस्फोट

काबुलमधील गुरुवारी झालेले बॉम्बस्फोट हे अमेरिका आणि तालिबानच्या सुरक्षा दलांचे अपयश आहे. कारण, गुप्तचरांनी इशारा देऊनही त्यांना दुर्घटना टाळता आली नाही, याबाबत वरिष्ठ पत्रकार संजीब बरुराह यांनी लिहिलेला रिपोर्ट.

काबुल विमानतळावरील बॉम्बस्फोट
काबुल विमानतळावरील बॉम्बस्फोट
author img

By

Published : Aug 27, 2021, 7:04 PM IST

नवी दिल्ली - अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक धोका असल्याचा अलर्ट जारी केला होता. तेथून लोकांना दूर जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, इस्लामिक स्टेट ऑफ खुरासानने (ISIS-K) अमेरिकन सैनिक असलेल्या गर्दीत गुरुवारी आत्मघाती हल्लेखोर घुसविले. यावेळी झालेल्या स्फोटात 13 अमेरिकन सैनिकांसहित 103 लोकांचा मृत्यू झाला.

काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लोकांना काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. 31 ऑगस्टपर्यंत नागरिकांना अफगाणिस्तानमधून काढण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहेत. हजारो लोक अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारपासून वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी अनेक नागरिक विमानतळावर आणि बाहेर विमानाची वाट पाहत आहेत.

अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, नेदरलँड, जर्मनीसहत विविध देशांनी आणि तालिबानच्या एका अधिकाऱ्यांनी काबुल विमानतळावर असलेल्या धोक्याचा इशारा दिला होता. काबुल विमानतळावर तालिबानचे सुरक्षा रक्षक जीवाचा धोका पत्करत असल्याचे तालिबानच्या एका अधिकाऱ्याने म्हटले होते. तसेच इस्लामिक स्टेटशी संबंधित धोका असल्याचे अधिकाऱ्याने म्हटले होते.

हेही वाचा-आसाममध्ये डीएनएलएच्या अतिरेक्यांनी पेटवले ट्रक, 5 चालकांचा मृत्यू

बॉम्बस्फोटापूर्वी अमेरिकेनेही धोक्याचा दिला होता इशारा

काबुलमधील अमेरिकी दुतावासाने अलर्ट जारी करत अमेरिकन नागरिकांना एबी गेट, ईस्ट गेट व नॉर्थ गेट त्वरित सोडण्याचे निर्देश दिले होते. हे परिसर असुरक्षित असल्याचे अलर्टमध्ये म्हटले होते. बॉम्बस्फोटानंतर सुरक्षा व्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

अबै गेट (Abbey gate) आणि बॅरन हॉटलच्या प्रवेश द्वारावर (Baron hotel entrance) बॉम्बस्फोट झाले होते. या ठिकाणी पोहोचण्यासाठी तालिबानद्वारा चालविण्यात येणारे नाके पार करावे लागतात.

हेही वाचा-कोडरमा औष्णिक प्रकल्पात लिफ्ट कोसळल्याने चार जणांचा मृत्यू; मृतामध्ये महाराष्ट्राचे दोन

विमानतळावर आणि विमानतळाबाहेर सुमारे 6 हजार अमेरिकन सैनिक

विमानतळाच्या बाहेर रेड युनिटची कडक सुरक्षा आहे. रेड युनिट हे तालिबानचे सर्वाधिक शक्तीशाली सुरक्षा दल आहे. तर अमेरिकेच्या सैन्याकडून 10 व्या माउंटेन डिवीजन विमानतळानजीक सुरक्षा करण्यात येते. तर युएस 82 व्या एअरबोर्ड डिव्हिजनकडून धावपट्टीची सुरक्षा करण्यात येते. 24 व्या मराईन एक्सपेडिशनरी युनिट हे नागरिकांच्या जीविताचे रक्षण करते. विमानतळावर आणि विमानतळाबाहेर सुमारे 6 हजार अमेरिकन सैनिक आहेत.

बॉम्बस्फोटाची इस्लामिक स्टेट ऑफ खुरासानने स्वीकारली जबाबदारी

इस्लामिक स्टेट ऑफ खुरासानचे इराक आणि सीरियावर नियंत्रण आहे. ही दहशतवाद्यांची कट्टर संघटना आहे. अलीकडच्या काळात ही संघटना अनेक लोकांना एकाचवेळी फाशी देऊन त्यांचे व्हिडिओ व्हायरल करत आहेत. 72 जणांचा बळी घेणाऱ्या काबूल विमानतळावरील आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या 'आयएस-के'चा जन्म पूर्व अफगाणिस्तानात सहा वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर अल्पावधीतच अतिशय झपाट्याने ही संघटना फोफावत गेली आणि जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी संघटना म्हणून उदयास आली.

हेही वाचा-लखनौ : बलात्कार पीडिता आत्महदहन प्रकरणात माजी आयपीएस अमिताभ ठाकुरांना अटक

असे पडले खुरासान हे नाव -

इस्लामिक स्टेट या मूळ दहशतवादी संघटनेचे मुख्य फायटर्स सीरिया आणि इराकला गेल्यानंतर मध्य आशियातील संघटनेच्या या शाखेचा 2014 मध्ये अफगाणिस्तानात उदय झाला. इस्लामिक स्टेट-खुरासान असे या शाखेला संबोधले जाते. मध्ययुगीन कालखंडात अफगाणिस्तानसह इराण आणि मध्य आशियातील भूभागाला खुरासान असे संबोधले जात असे. त्यावरून खुरासान हे नाव इस्लामिक स्टेटने या शाखेसाठी जोडले. ही संघटना आयएसके किंवा आयएसआयएसके या नावानेही ओळखली जाते. दरम्यान, सीरिया आणि इराकमधून इस्लामिक स्टेटला संपविण्यासाठी आंतरराष्ट्रीय फौजांना पाच वर्षे लागली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.