ETV Bharat / bharat

इसिसचा दहशतवादी दिल्लीत राहिला होता मुक्कामी; तालिबानींची सत्ता आल्यानंतर काबुलमध्ये घडविला बॉम्बस्फोट - काबुल विमानतळावर आत्मघातकी हल्ला

इसिसचे पुन्हा एकदा भारतामधील अस्तित्व असल्याचे दाखवून दिले आहे. त्यासाठी इसिसने भारतामध्ये राहिलेल्या दहशतवाद्याची ओळख जाहीर केली आहे. विशेष म्हणजे इसिसने ही माहिती त्यांचा मासिकात दिली आहे.

इसिस
इसिस
author img

By

Published : Sep 18, 2021, 5:32 PM IST

नवी दिल्ली - इसिसची विलायत हिंद नावाने भारतामध्ये शाखा कार्यरत आहे. या दहशतवादी संघटनेने स्वात-अल-हिंद नावाने मासिक प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये इसिसने आपल्याच दहशतवादाच्या कामगिरीचे गोडवे गात धक्कादायक दावे केले आहेत.

काबुल विमानतळावर आत्मघातकी हल्ला करणाऱ्या अब्दुर रहमान अल लोगरी या दहशतवाद्याला नवी दिल्लीत पाच वर्षापूर्वी अटक करण्यात आली होती. 25 वर्षांचा असताना अब्दुर रहमान हा दिल्लीत आला होता. त्याने दिल्ली-फरीदाबादमधील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षणासाठी प्रवेशही घेतला होता. तेव्हा हा दहशतवादी काश्मीरमधील बदला घेण्याच्या मोहिमेवर होता, असे इसिसने म्हटले आहे. त्याला भारतीय पोलिसांनी अटक करून अफगाणिस्तानच्या ताब्यात दिले होते.

हेही वाचा-बाबुल सुप्रियोंंनी बदलले राजकारणाचे सूर; अचानक घेतला तृणमुलमध्ये पक्षप्रवेश

दहशतवाद्याने अफगाणिस्तानमध्ये घडविले होते बॉम्बस्फोट-

दहशतवाद्याने 16 ऑगस्ट 2021 रोजी काबूल विमानतळावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात सहभाग घेतला होता. ही घटना तालिबानने काबुल ताब्यात घेतल्यानंतर 11 दिवसांनी घडली होती. अमेरिकेच्या सैनिक तुकडींपासून अवघ्या 5 मीटर अंतरावर बॉम्बस्फोट झाल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती. त्याच्या आत्मघातकी हल्ल्यात 250 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये 13 नौसैनिक तर 12 हून अधिक तालिबानी सैनिकांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा-जाणून घ्या, कोण होणार पंजाबचा नवा मुख्यमंत्री, 'ही' तीन नावे चर्चेत

रॉने देखील दहशतवाद्यावर ठेवली होती पाळत-

अब्दुर रहमान अल-लोगरीला दिल्लीमध्ये सप्टेंबर 2017 ला अटक केली होती. त्याच्यावर 18 महिने रॉ या भारतीय गुप्तचर संघटनेने पाळत ठेवली होती. एवढेच नव्हे तर त्याला दिल्लीमधील लजपत नगरमध्ये अपार्टमेंट भाड्याने मिळवून देण्यास मदत केली होती. यामधून त्याने अब्दुर रहमान अल-लोगरीचा विश्वास संपादन केला होता.

हेही वाचा-पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग म्हणाले,...

तालिबानने कैद्यांची केली होती मुक्तता

अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या कस्टडीमध्ये त्याला ठेवण्यात आले. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर 14 व 15 ऑगस्टला तुरुंगातील कैद्यांची मुक्तता केली. त्यामध्ये या दहशतवाद्याचाही समावेश होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.