हैदराबाद : रजनीकांत यांच्या 'कबाली' चित्रपटाचा निर्माता वितरक कृष्ण प्रसाद चौधरी उर्फ केपी चौधरी याला ड्रग्ज विक्री प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 82.75 ग्रॅम कोकेन, एक कार, 2.05 लाख रुपये रोख आणि 4 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत 78 लाख रुपये असल्याचे समोर आले आहे. के. पी. चौधरी याला अटक करून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नायजेरियातील पेटिट इजुबार हा आणखी एक संशयित फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चित्रपटांसाठी वितरक म्हणूनही काम केले : के. पी चौधरी याने बीटेक मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे. तसेच त्याने महाराष्ट्रात एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मॅनेजर म्हणून काम केले आहे. नोकरी सोडल्यानंतर त्याने 2016 मध्ये चित्रपट उद्योगात प्रवेश केला. रजनीकांत अभिनीत 'कबाली' या तेलुगू चित्रपटात त्याने निर्माता म्हणून काम केले. त्याने अनेक तेलुगु आणि तमिळ चित्रपटांसाठी वितरक म्हणूनही काम केले आहे.
सेलिब्रिटींनाही ड्रग्ज पुरवायचा : चित्रपट व्यवसायाच्या या कामात अपेक्षेइतका नफा न मिळाल्याने तो ड्रग्ज प्रकरणात अडकला. त्यासाठी त्याने गोव्यात ओएचएएम नावाचा पब सुरू केला. हैदराबादहून तिथे येणाऱ्या सेलिब्रिटींना तो ड्रग्ज पुरवायचा. त्या व्यवसायातही तोटा झाल्याने तो एप्रिलमध्ये हैदराबादला परतला. गोव्यातून येण्यापूर्वी त्याने पेटिट येझुबार नावाच्या नायजेरियन व्यक्तीकडून कोकेनची 100 पाकिटे आणली होती. त्यातील काही त्याने वापरली. काल रात्री किस्मतपूर क्रॉस रोडवर विक्रीचा प्रयत्न करत असताना राजेंद्रनगर पोलिसांनी त्याला पकडले.
हैदराबादमध्ये पोलिसांनी ड्रग्ज जप्त केले : हैदराबाद पोलिसांनी नुकतेच बेंगळुरू येथून अमली पदार्थ आणून त्याची विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली. अटक करण्यात आलेले शाहबाज खान आणि युसूफ शरीफ हे बंगळुरूमधील एका कपड्याच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करायचे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बेंगळुरू परिसरातील अज्ञात व्यक्तींकडून ड्रग्ज खरेदी करायचे आणि हैदराबादमध्ये आणून त्यांची विक्री करायचे. त्यांच्याकडून 2 लाख 20 हजार रुपये किमतीचे 22.9 ग्रॅम प्रतिबंधित एमडीएमए औषध, तीन मोबाईल आणि एक चाकू जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा :